

चिपळुणात रंगला उत्सव नाट्यकलांचा
कलाकारांचा सहभाग, एकपात्री अभिनयाचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात थिएटर अॅकॅडमीतर्फे ''नाट्यरंग-उत्सव नाट्यकलांचा'' हा आगळावेगळा नाट्य कार्यक्रम नुकताच झाला. कार्यक्रमात लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संकेत हळदे यांच्या थिएटर अॅकॅडमीच्या २५ कलाकार व तंत्रज्ञांनी सहभाग घेतला. यामध्ये संकेत हळदे लिखित आणि दिलीप आंब्रे, संकेत हळदे दिग्दर्शित मराठी एकांकिका बर्थडे विश, असादत मोरे लिखित, दिग्दर्शित गाजर हे प्रहसन, रोहित बेर्डे लिखित, दिग्दर्शित चोराच्या उलट्या बोंबा हा मुकाभिनय (माईम), प्रगती खोत, क्रांती कांबळे, अथर्व महाडिक यांनी एकपात्री अभिनय तसेच आर्या पोटे हिने नांदी आणि नाट्यसंगीत सादर केले. संयोजनाची जबाबदारी छाया पोटे आणि सुशील कांबळे यांनी सांभाळली तर प्रकाशयोजनेची जबाबदारी उदय पोटे यांनी सांभाळली. नेपथ्याची जबाबदारी संकेत भुवड यांनी सांभाळली. या कार्यक्रमात कलाकार म्हणून आतिश तांबे, सिद्धी शिर्के, आदिती लाड, चैतन्य देवरूखकर, मैत्रेयी परब, योगेश जाडे, गौरी जाधव, सान्वी जोशी, मीरा पोंक्षे, अजिंक्य पोटे, रम्बिर पवार, सौरभ महाडिक, ऋषिकेश भोई यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रम सुरू असताना चांगले सहकार्य करणाऱ्या चिपळूण पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.