भारत जोडो स्वतःसाठी नव्हे लोकांसाठी

भारत जोडो स्वतःसाठी नव्हे लोकांसाठी
Published on

20667

‘भारत जोडो’ स्वतःसाठी नव्हे लोकांसाठी

प्रिती शक्तावत ः दोडामार्ग तालुक्यात काँग्रेसचा दौरा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २२ ः काँग्रेसने काय केले असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षाने हे जाणून घ्यावे की, सुईपासून ते हवाई जहाज काँग्रेसने बनवले आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसच्या कित्येक नेत्यांनी आहुती दिली आहे. राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो’ यात्रा स्वतः साठी नसून ती देशातील प्रत्येक नागरिक कोणत्या परिस्थितून जात आहेत याचा आढावा घेण्यासाठी होती. सत्ताधाऱ्यांनी महागाई वाढविल्याने जनता हलाखीचे जीवन जगत आहे, अशी टीका अशी राजस्थानच्या उदयपूर वल्लभनगर मतदारसंघाच्या आमदार प्रिती शक्तावत यांनी केंद्र सरकारवर केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शक्तावर या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्या होत्या. तळागाळातील काँग्रेसची परिस्थिती काय आहे, याची आढावा त्यांनी घेतला. दोडामार्ग येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘महिला काँग्रेसच्यावतीने सर्वेक्षण करण्यासाठी मी जिल्ह्याला भेट देत आहे. येणाऱ्या पुढील काळात महिलांचे भागीदारी जास्त असायला हवी हे उद्देश आहे. आताच्या राजकारणात पाहिलात तर महिला अधिक मेहनतीने काम करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती काय आहे? संघटनाचे काम कोणत्या पद्धतीने चाललेले आहे? आणि सिंधुदुर्गात काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने मजबूत करता येईल? याचा आढावा घेत आहे. सावंतवाडीचे राजे यांनी त्या काळात काँग्रेसच्या माध्यमातून पाच वेळा निवडणुका जिंकल्या आहेत. कोकणात तसेच सिंधुदुर्गात काँग्रेसची पाळेमुळे अजूनही जिवंत आहेत. सिंधुदुर्गात आल्यावर असं वाटले की काँग्रेस पक्ष लोकांच्या मनामनात आहे. येथील लोकांकडून स्नेह आणि सन्मान मिळाला. परंतु, काँग्रेस पक्ष पुढे नेता असेल तर येथील स्थानिक पातळीवर थोडी मेहनत करण्याची गरज आहे. सावंतवाडी मतदारसंघात काँग्रेसला सीट मिळाले तर निश्चितच काँग्रेसचा उमेदवारच निवडून येईल. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली ती आपल्या स्वार्थासाठी नसून देशातील जनतेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी होती.’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याप्रती हे सत्ताधारी कोणत्या प्रकारे वागले हे सिंधुदुर्गातील त्या घटनेवरून संपूर्ण देशाने पाहिले. गेल्या दहा वर्षांत या सत्ताधाऱ्यांनी देशाची जी हालत केली आहे ती बदलण्यासाठी काँग्रेसला मजबूत करण्याची गरज आहे.’’ यावेळी जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे, महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्ष रूपाली कापसे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुभाष दळवी, तालुका उपाध्यक्ष सुभाष मणेरकर उपस्थित होते.
---
सिंधुदुर्गला एक जागा देण्याची मागणी
सौ. वंजारी म्हणाल्या, ‘‘जिल्ह्याच्या विकासासाठी जबाबदारी द्यावी, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सातत्याने मागणी केली आहे. जोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला संधी देत नाही तोपर्यंत त्याच्या कामाची दिशा आपल्याला समजू शकणार नाही. गेले तीन वेळा आमदार व मंत्रिपद भूषविलेले जर काही विकसित कामे करू शकत नाही. तर, त्यांना पुन्हा निवडून देण्यात काय अर्थ आहे. एकदा मला संधी देऊन बघा, आम्ही विकासासाठी सर्वतोपरी झोकून देऊ. सावंतवाडी मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काँग्रेसला एक जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यानुसार ‘महाविकास’ सोबत राहू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com