

मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त असतानाच मंडणगडमध्ये गुरुवारी सायंकाळी एक तास मुसळधार पाऊस बरसल्याने उन्हाच्या काहीलीने त्रस्त झालेले मंडणगडमधील नागरिकांना काहीअंशी का होईना उकाड्यापासून दिलासा मिळाला; मात्र आंबा-काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. तर रत्नागिरीत शुक्रवारी सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते.
गेले काही दिवस उन्हाचा उकाडा वाढलेला आहे. सायंकाळी अचानक ढग दाटून आले होते. मात्र पाऊस झाला नाही. पण रात्री विजांचा लखलखाटासह मुसळधार पावसाने बॅटिंग केली. तासभर पडलेल्या पावसाने रस्ते भिजून गेले. या पावसाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. तालुक्यात पावसाने अचानक लावलेली हजेरी यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. मंडणगडबरोबरच रत्नागिरीतही पावसाचे वातावरण होते. किनारी भागात गार वारेही वाहू लागले होते. त्यामुळे बागायतदारांची तारांबळ उडाली. सायंकाळी अनेक बागायतदारांनी आंब्याची काढणी थांबवली होती. तसेच काढलेला आंबा सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरवात केली होती.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.