-उन्हाळी सुट्टी हंगामातही एसटीचे उपाहारगृह बंदच

-उन्हाळी सुट्टी हंगामातही एसटीचे उपाहारगृह बंदच
Published on: 

- rat७p१५.jpg-
२५N६२३२५
खेड ः बसस्थानकातील बंद असलेले एसटीचे उपहारगृह.
----
उन्हाळी सुटीतही एसटीचे उपाहारगृह बंदच
खेड आगारप्रमुखांचे दुर्लक्ष : प्रवाशांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ : उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाल्याने येथील एसटी बसस्थानक प्रवाशांच्या रेलचेलीने गजबजलेले असतानाही एसटी प्रशासनाचे उपहारगृह अजूनही बंदच आहे.
गेल्या दीड वर्षापासून एसटीच्या उपहारगृहाला लागलेले कुलूप अजूनही कायम आहे. याचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. सकाळच्या सुमारास अन्य हॉटेल, सर्व टपरी बंद असल्याने प्रवाशांची परवड होते. गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या पद्धतीने बचतगटाला प्रवाशांच्या नाष्ट्याची सोय करण्याची मुभा दिली होती. गणेशोत्सवानंतर उपहारगृहातील बचतगटाचे बस्तान उठले. तेव्हापासून उपहारगृह बंदच आहे. एसटी बसचालक वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही उपहारगृह बंद असल्याने फटका बसत आहे. एसटी प्रशासन पर्यायी व्यवस्था करत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
---
भाडे थकवल्याचे सांगून बदनामी
या संदर्भात पूर्वीचे ठेकेदार आनंदराव टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी कोणतेही भाडे थकवलेले नाही. मला परवडत नाही. त्यामुळे मी एसटीचे उपाहारगृह दीड वर्षांपूर्वीच बंद केले आहे. तसा लेखी राजीनामा एसटी महामंडळाकडे सुपूर्द केला आहे. मी सोडल्यानंतर या ठिकाणी नवीन निविदा काढून एसटी उपहारगृह चालवायला देणे आवश्यक होते; परंतु स्थानिक अधिकारी व कर्मचारी आपलीच मनमानी करत असून मी भाडे थकवले, अशा पद्धतीने बोंबाबोंब करून माझी नाहक बदनामी करत आहेत.
--
अन्यथा उपोषण...
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीचे उपहारगृह सुरू करणे गरजेचे आहे. केवळ आपली जबाबदारी झटकण्यासाठी जुन्या परवानाधारकावर नको ते आरोप करणे चुकीचे आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी उपहारगृह सुरू करावे अन्यथा प्रवाशांना सोबत घेऊन उपोषणासारखा मार्ग पत्करावा लागेल, अशी प्रतिक्रिया खेड येथील वकील सैफ चौगुले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com