

-rat१p८.jpg-
P२५O०१७५८
रत्नागिरी : प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत बॅंक ऑफ इंडियातर्फे लाभार्थ्यांना धनादेश देताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाप्रबंधक एच. एस. वर्मा. सोबत दर्शन कानसे, हरजित सिंग गिल, साक्षी वायंगणकर, संतोष बारगोडे आदी.
---------
कोतवडेत बॅंक ऑफ इंडियातर्फे
आर्थिक समावेशन योजना शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : शासनाच्या योजनांचा तळागाळात लाभ पोहोचण्याच्या हेतूने रत्नागिरी जिल्हा अग्रणी बॅंक असलेल्या बँक ऑफ इंडियाने कोतवडे येथे शिबिर आयोजित केले. आर्थिक समावेशन योजनांबाबत तसेच रि-केवायसी जनजागृती मोहिमेअंतर्गत शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. २००हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडियाद्वारे दोन लाखांचे दोन दावा धनादेश वितरित केले.
या शिबिरामुळे स्थानिकांना विविध वित्तीय योजना आणि सेवा समजून घेण्याची संधी मिळाली. परिवर्तन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाप्रबंधक एच. एस. वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी रि-केवायसी का आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय आणि डिजिटल अरेस्ट या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती केली. त्या प्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रबंधक बेनजीर शेख यांनी रि-केवायसी आणि निष्क्रिय ठेव मोहिमेबाबत जनजागरूकता केली.
कार्यक्रमास अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, बँक ऑफ इंडिया कोतवडे शाखा व्यवस्थापक हरजित सिंग गिल, रत्नागिरी तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगणकर, कोतवडे सरपंच संतोष बारगोडे आणि ग्रामविकास अधिकारी देविदास इंगळे आदी उपस्थित होते. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे उपअंचल प्रबंधक आदी उपस्थित होते.