नाट्य परिषद शाखेतर्फे आज मराठी रंगभूमी दिन
नाट्य परिषद शाखेतर्फे
आज मराठी रंगभूमी दिन
रत्नागिरीः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे बुधवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजता मारूती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर मराठी रंगभूमी दिन साजरा होणार आहे. रंगभूमीदिनाच्या या कार्यक्रमात नटराज पूजन, नाट्यवाचन केले जाणार आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे साधेपणाने शाखेच्या कार्यालयात साजरा होणार आहे. रंगकर्मींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.
--------------
दहावी, परीक्षेचे
वेळापत्रक जाहीर
रत्नागिरी ः फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केली आहे. बारावीसाठी सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या दरम्यान तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्युएफअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते सोमवार ९ फेब्रुवारीदरम्यान होईल. दहावी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होईल. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.
---------
कडवईतील प्रभाग संघाची कार्यशाळा
संगमेश्वर ः उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कुटुंब श्री एनआरओ केरळ यांच्यावतीने स्वराज्य महिला प्रभाग संघ कडवईची कार्यशाळा गोळवली येथील सभागृहात झाली. पंचायतराज इन्स्टिट्युशन आणि कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन (पीआरआयसीबीओ) प्रकल्पाची थोडक्यात माहिती प्रभाग समन्वयक पाताडे यांनी दिली. या कार्यशाळेस तुरळ ग्रामपंचायतीचे सरपंच सहदेव सुवरे उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून बालसभा स्थापन केल्या आहेत. त्याचे प्रतिनिधी म्हणून दिव्या गुरव, युवराज राठोड, प्रभाग संघ सचिव पाचकले, प्रभाग समन्वयक प्रदीप पाताडे, प्रभाग व्यवस्थापक सोलकर, ग्रामसंघ पदाधिकारी, धामपूर प्रभागसंघाचे समन्वयक आणि सर्व सीआरपी उपस्थित होत्या. या प्रसंगी प्रतिनिधी म्हणून दिव्या गुरव या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली.
-------
‘जुना कालभैरव’तर्फे
आज दीपोत्सव
चिपळूण ः शहराचे जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा श्री ग्रामदेव जुना कालभैरव-श्री देवी जोगेश्वरी मंदिर (चिपळूण) व श्री केदार-श्री देवी जाखमाता मंदिर (वैश्यवसाहत) येथे दीपोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने साजरा करण्यात येणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री जुना कालभैरव मंदिर प्रांगणात येथील विघ्नहर्ता ग्रुपने दिवाळीपासून साकारलेला किल्ले तोरणा (प्रचंडगड) प्रतिकृती आणि दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित किल्ले किंवा गडप्रतिकृती छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टअंतर्गत देवस्थाने श्री देवी एकवीरा (वडनाका), श्री क्षेत्र गांधारेश्वर येथील श्री गांधारेश्वर मंदिर, श्री भवानी मंदिर (मुरादपूर) येथेही प्रतिवर्षाप्रमाणेच यंदाही त्रिपुरारी दीपोत्सव साजरा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

