चिपळूण ः जान्हवी बापट यांचा सह्याद्रीरत्न पुरस्काराने गौरव

चिपळूण ः जान्हवी बापट यांचा सह्याद्रीरत्न पुरस्काराने गौरव

Published on

ratchl१११.jpg
03750
चिपळूणः वर्ल्ड फॉर नेचर इंडियाच्या निसर्गमित्र मेळाव्यात सहभागी मित्र.
----------
जान्हवी बापट यांना ‘सह्याद्रीरत्न’
वर्ल्ड फॉर नेचर इंडिया; वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः निसर्ग संवर्धन व सामाजिक, वन्यजीवांना वाचवण्यासाठी अविरत झटणाऱ्या वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी जिल्हा शाखेचा पाचवा वर्धापनदिन शहरातील वनविभागाच्या फोटो गॅलरी कॉन्फरन्स हॉलमध्ये झाला. या निमित्ताने (कै.) नीलेश बापट यांनी निसर्ग, पर्यावरणासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या स्मरणार्थ जान्हवी बापट यांना मानपत्र, मानचिन्ह देऊन सह्याद्रीरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
विविध मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रथमोश पवार यांनी संस्थेच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी विजय हुंबरे, दत्तात्रय शिरसाट, सूर्यकांत तांदळे, राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. आदर्श समाजभूषण पुरस्काराचा मान सुभाष आदवडे यांना मिळाला. तुषार नेवरेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार मुझम्मिल काझी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार तानाजी कांबळे, संतोष रेपाळ, गणेश सुर्वे, क्रीडारत्न पुरस्कार जाकीर परकार, वर्ल्ड फॉर नेचर राज्यस्तरीय निसर्गसेवक पुरस्कार संदेश जाधव, बाळकृष्ण कदम, श्रीराम रसाळ, वैभव बाईत, ज्ञानज्योती फाउंडेशन, शरद आपटे यांना देण्यात आला. सह्याद्रीरत्न नीलेश बापट आदर्श वन्यजीव रक्षक पुरस्कार हा जयदीप काळणे, श्रीराम रसाळ, तुषार महाडिक, मिलिंद गोरिवले, फाहद जमादार, अक्षय गोंधळेकर, मयूर चव्हाण, किरण करमरकर, ओम साळवी, संकेत नरवणकर, किशोर निवळकर, मनित बाईत, प्रतीक बाईत, अनिकेत जाधव, सुरेश खानविलकर, लक्ष्मी जाधव, प्रसाद विचारे, राकेश काठे यांना देण्यात आला.
यावेळी गिरिजा देसाई, रामशेठ रेडीज, बापू काणे, शुभम पांडे, अभिजित वाघमोडे, विलास महाडिक, धीरज वाटेकर, समीर कोवळे उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com