राज्य नाट्य स्पर्धा
राज्य नाट्य स्पर्धा--------लोगो
(२३ नोव्हेंबर पान ७)
rat २५p४.jpg-
२५O०६५३१
रत्नागिरी- राज्य नाट्यस्पर्धेत श्री देव गणपती ऑफ धामापूर अॅण्ड मारुती ऑफ माखजन या संस्थेने केलेल्या ‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
---
सुखांशी भांडतो आम्ही....मधून
अंतर्मनाच्या जगात डोकावण्याचा प्रयत्न
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः सामान्य माणसाच्या जीवनात येणारे सुख आणि दुःख यांच्यातील संघर्षावर तसेच आंतरमन व बाह्यमन या यावर भाष्य करणारी संहिता ‘सुखांशी भांडतो आम्ही’ अभिराम भडकमकर यांनी लिहिली आहे. राज्य नाट्यस्पर्धेत श्री देव गणपती ऑफ धामापूर अॅण्ड मारुती ऑफ माखजन या संस्थेने प्रयोग केला. जीवनात आनंद मिळवण्याची धडपड आणि अडचणीवर मात करून पुढे जाणारे हे नाटक नेपथ्य, प्रकाशयोजना, कलाकारांच्या अभिनय आणि दिग्दर्शनात नाटक यशस्वी झाले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
काय आहे नाटक ?
सुखांशी भांडतो आम्ही नाटक सामान्य माणसांच्या जीवनातील सुख आणि दुःख यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. जीवनात आनंद मिळवण्यासाठी मनुष्य धडपडत असतो. त्यात अनेकवेळा अडचणी येतात....यावर भाष्य करणारे हे नाटक आहे. या नाटकातील डॉ. श्रीधर त्यांची पत्नी मीता आणि किशोरवयीन मुलगा अक्षय हे तिघे यशस्वी, आनंदी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत असतात. डॉ. श्रीधर हे पिंपळगावमधून मुंबईसारख्या मोठ्या शहरात येतात. तिथे आल्यावर ते प्रसिद्ध मनोसपोचार तज्ज्ञ म्हणून नावारूपाला येतात; मात्र त्यांचा मुलगा अक्षय बहुउपयोगी रुग्णालय बांधू इच्छित असतो. त्या स्वप्नातील रुग्णालय बांधण्यासाठी तो एका मध्यवर्ती जमिनीवर लक्ष केंद्रीत करतो; परंतु ती जमीन मुलांसाठी खेळाच्या मैदानासाठी राखीव आहे, हे कळल्यावर श्रीधर जमीन मिळवण्यासाठी आपला राजकीय प्रभाव आणि आर्थिक शक्ती वापरण्यास तयार असतो. या कालावधीत डॉ. श्रीधर यांच्याकडे स्किझोफ्रेनिया झालेला रुग्ण सदा (सदाशिव) येतो. तो एक उत्तम शिक्षकही असतो. भाषेवर त्याचे प्रभुत्व असतो. स्किझोफ्रेनिया रुग्ण असलेल्या सदाला स्वतःच्या पत्नी आणि मुलाची हत्या केल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागलेला असतो. अनेक डॉक्टरांनी त्याला व्यवस्थित झाला असल्याचे सांगून दवाखान्यातून परत पाठवलेले असते. एके दिवशी सदा मानसोपच्चार तज्ज्ञ डॉ. श्रीधर यांच्याकडे येतो. त्यांच्या आंतरमन आणि बाह्यमनाच्या बोलण्यावर व मनोरंजक प्रश्नावर श्रीधर प्रभावित होतात आणि त्याला आपल्या रुग्णालयात राहायला सांगतात. अनेकवेळा त्याला स्किझोफ्रेनियाचा झटका येत असतो. तरीही त्या दोघांचीही गट्टी जमते. या गडबडीत डॉ. श्रीधरही सदाप्रमाणेच आंतरमन आणि बाह्यमनासारखा वागू लागतो, हे डॉ. श्रीधरची पत्नी मिता हिच्या लक्षात येते. एकदा श्रीधरची पत्नी मिता आणि सदा यांच्यात बोलणे सुरू असते. त्याचवेळी अक्षयचा फोन येतो. अक्षय आईला सांगतो, मला परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळालेली आहे. तिथे ग्रीनकार्डही मिळणार असून, मी लागलीच परदेशात जाणार असल्याचे सांगतो. त्यानंतर मिता सदाला रुग्णालयातून कायमचे जाण्यास सांगते. परिस्थिती पाहून सदाही तिथून निघून जातो. इकडे डॉ. श्रीधर व मिता मुलगा अक्षयला समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यात यश येत नाही. अखेर अक्षय परदेशात निघून जातो तसेच जाताना सांगतो की, जे तुम्ही माझ्यासाठी करत आहात त्याचा उपभोग तुम्हीच घ्या; परंतु डॉ. श्रीधर आणि मिता हे सदा म्हणजेच सदाशिव याची आठवण म्हणून त्याच्या नावाने बालउद्यान तयार करतात. इथेच या नाटकाचा शेवट दाखवलेला आहे. सुखांशी भांडतो आम्ही....या नाटकाची कथा मनोरंजक आणि अनपेक्षित वळणावर येऊन थांबलेली दाखवण्यात आली आहे.
---
सूत्रधार आणि साह्य
दिग्दर्शक ः मंदार साठे, नेपथ्य ः सत्यजित गुरव, प्रकाशयोजना ः सुयोग सहस्रबुद्धे व आदित्य भागवत. पार्श्वसंगीत ः श्रीकांत फाटक, रंगभूषा ः काव्या साठे, रंगमंच व्यवस्था ः आनंद जोशी, मैत्रयी करमरकर.
-----
पात्र परिचय
सदा ः प्रसन्न बापट, मिता ः संपदा बापट, श्रीधर ः समीर पाटणकर, कमळाबाई ः श्रद्धा केतकर, प्रधानबाई ः अन्वयी बापट, अक्षय ः कौस्तुभ ओगले, सहकलाकार ः ओंकार साठे, स्पृहा पाटणकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

