रत्नागिरी-लव्ह जिहाद विरोधी कायद्याची

रत्नागिरी-लव्ह जिहाद विरोधी कायद्याची

Published on

rat9p27.jpg-
09599
रत्नागिरी : हिंदू जनजागृती समितीने लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांना दिले.
-------
लव्ह जिहादविरोधी कायदा करा
हिंदू जनजागृती समितीची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र म्हणजे लव्ह जिहाद. हा लव्ह जिहाद संपवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चालू हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा संमत करावा, यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना हिंदू जनजागृती समितीने निवेदन दिले.
लव्ह जिहाद ही कल्पना नसून, एक संघटित कट आहे. भारतीय दंड संहितेमधून फसवणूक, अपहरण, खोटी ओळख या कलमांचा वापर या प्रकरणांमध्ये होतो; परंतु या विद्यमान तरतुदींचा वापर करून जबरी धर्मांतर, फसवणूक, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण इत्यादी गंभीर गुन्हे थांबवणे कठीण आहे. यासाठी कायदा होणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे गोविंद भारद्वाज, शुभांगी मुळ्ये, अस्मिता सरदेसाई, मनीषा बामणे, गणेश गायकवाड, प्रभाकर खानविलकर, राजेश तोडणकर, गणेश घडशी, शैलेश बेर्डे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com