पावस-कुर्धेतील रस्ता कामांना सुरवात
rat12p31.jpg-
10291
पावस ः कुर्धे स्वरूपनगर परिसरामध्ये रस्ताकामाचा प्रारंभ करताना शाखाप्रमुख आशुतोष अभ्यंकर. शेजारी मल्हार पोटे, विलास वारिशे, विजय चव्हाण, शिंदे, अजय तेंडुलकर, नंदकुमार मिराशी, मुरलीधर फडके आदी.
------------
कुर्धेतील रस्त्यांच्या कामांना सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १३ ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे गावामध्ये जनसुविधा योजनेंतर्गत वीस लाखाचा निधी खर्च करून रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील भुतेवाडी, बेहेरेवाडी व स्वरूपनगरमधील रस्त्यासाठी जनसुविधा कार्यक्रमांतर्गत वीस लाखाचा निधी रस्ताकामासाठी देण्यात आला. या कामाचा प्रारंभ पावस शिवसेना विभागप्रमुख विजय चव्हाण, उपतालुकाप्रमुख बंधू वारीशे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी तालुका संघटक अजय तेंडुलकर, युवा सेनाप्रमुख नंदू भाटकर, कुर्धे शिवसेना शाखाप्रमुख आशुतोष अभ्यंकर, महिला आघाडीप्रमुख शिंदे ठेकेदार, राजू पवार उपस्थित होते.
याबाबत विभागप्रमुख विजय चव्हाण म्हणाले, ग्रामस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार, या जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात पालकमंत्री उदय सामंत निधी उपलब्ध करून देत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सक्रिय होऊन मिळालेल्या निधीतून गावामध्ये कामे करून घेऊन ती कामे प्रत्येकापर्यंत पोचवणे गरजेचे आहे.

