पुरुष गटात लांजा स्पोर्ट्स, महिला गटात आर्यन क्लब विजयी

पुरुष गटात लांजा स्पोर्ट्स, महिला गटात आर्यन क्लब विजयी

Published on

- rat१६p२१.jpg-
P२५O११०६०
रत्नागिरी ः जिल्हा खो-खो स्पर्धेत महिला गटातील विजयी आर्यन क्लब संघ.
- rat१६p२२.jpg-
२५O११०६१
रत्नागिरी ः जिल्हा खो-खो स्पर्धेत पुरुष गटातील विजयी लांजा स्पोर्टस् संघ.
----
लांजा स्पोर्ट्स, आर्यन क्लब विजयी
खो-खो अजिंक्यपद स्पर्धा ; आशिष बालदे, वैष्णवी फुटक अष्टपैलू खेळाडू
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १६ ः रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री लक्ष्मी पल्लीनाथ स्पोर्ट्स क्लब, पाली आयोजित पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटात लांजा स्पोर्ट्स क्लबने तर महिला गटात आर्यन स्पोर्ट्स क्लबने अजिंक्यपद पटकावले.
श्री लक्ष्मी पल्लीनाथ स्पोर्ट्स क्लब, पाली आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष गटात १८ तर महिला गटात आठ संघांनी सहभाग घेतला होता. १४ व १५ डिसेंबर या कालावधीत मराठा मंदिर पाली हायस्कूल येथे झाली. पुरुष गटातील अंतिम सामना चुरशीचा झाला. लांजा संघाने संगमेश्वर संघावर एक गुणांनी निसटता विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. लांजा संघाने अंतिम सामना १३-१२ असा जिंकला. लांजा संघाकडून हर्ष मानेने १.२० व १.१० मीनिटे संरक्षण तर रोहित रांबाडेने १.१०, १.४० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात चार खेळाडू बाद केले. संगमेश्वर संघाकडून आशिष बालदेने १.४० मी., नाबाद १.०० मी. संरक्षण केले. ओंकार मुंडेकरने चार खेळाडू बाद केले. महिला गटाच्या अंतिम सामन्यात आर्यन अ संघाने आर्यन ब संघावर अंतिम सामन्यात
९-२ असा एकतर्फी विजय मिळवला. आर्यन अ संघाकडून ऐश्वर्या सावंतने नाबाद २.५० मी., अपेक्षा सुतारने २ मी. संरक्षण केले. पायल पवारने आक्रमणात तीन खेळाडू बाद केले. ब संघाकडून एकाकी लढत देताना साक्षी लिंगायतने २.०० संरक्षण केले. पुरुष विजेत्या संघाला रोख रुपये १३ हजार ३३३, उपविजेत्या संघाला रुपये ९ हजार ९९९ तर महिला गटातील विजेत्या संघाला ५ हजार ५५५ रुपये व उपविजेत्या संघाला रुपये ३ हजार ३३३ रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या उद्‍घाटन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉ. मिलिंद वासुदेव, शिवसेना विभागप्रमुख सचिन सावंत, माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, शिवसेना उपविभागप्रमुख गौरव संसारे, माजी उपसभापती उत्तम सावंत, तसेच लक्ष्मी पल्लीनाथ स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष षण्मुखानंद पालकर, सचिव गौरंग लिंगायत, खजिनदार प्रतीक सावंत आदी उपस्थित होते.

चौकट
वैयक्तिक पारितोषिके
* अष्टपैलू खेळाडू ः आशिष बालदे (संगमेश्वर), वैष्णवी फुटक (आर्यन क्लब)
* उत्कृष्ट संरक्षक ः हर्ष माने
* उत्कृष्ट आक्रमक ः रोहित रांबाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com