RBI Rules: रिझर्व बँकेतला आपला हक्काचा पैसा कसा मिळवायचा? झोनल मॅनेजरने सांगितली ट्रिक

How to Claim Your Money form RBI: दहा वर्षांनंतरही खात्यातील रक्कम कशी मिळवायची? जाणून घ्या झोनल मॅनेजरकडून
Learn how to claim unclaimed money from RBI. Bank officials explain KYC process and your rights over inactive bank accounts

Learn how to claim unclaimed money from RBI. Bank officials explain KYC process and your rights over inactive bank accounts

esakal

Published on

आपला पैसा, आपला अधिकार, याबाबत प्रत्येक ग्राहकाने जागृत राहिले पाहिजे. दहा वर्षांत ज्यांनी बँक खाती ऑपरेट केली नाहीत, अशांची कोटींमध्ये रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा झाली आहे. ग्राहक सतर्क राहिला पाहिजे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे यांनी कुडाळ येथे केले.

‘आपला पैसा आपला अधिकार’ मोहिमेच्या कालावधीत १०४ खात्यांमधील २२.७३ लाख रुपयांचा दावा न केलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्यात आला. आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या मालमत्तेच्या कार्यक्षम व जलद वितरण अंतर्गत या मोहिमेचा प्रारंभ कुडाळ येथे नुकताच झाला.

Learn how to claim unclaimed money from RBI. Bank officials explain KYC process and your rights over inactive bank accounts

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी घरबसल्या करता येणार अर्ज! ‘या’ पोर्टलवर अर्ज केल्यावर 2 दिवसांत बॅंकांकडून मिळेल पीककर्ज, सोलापुरात शासनाचा पायलट प्रोजेक्ट

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक लि. सिंधुदुर्गच्या अधिकारी पी. पी. बागायतकर, उपप्रादेशिक व्यवस्थापक, सिंधुदुर्ग, एमएच ग्रामीण बँक सचिन नागरे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक (एल. आय. सी.) एच. ए. जोशी (कुडाळ), एसबीआय सिंधुदुर्ग मुख्य व्यवस्थापक स्नेहा आंबेकर, एलडीएम ऋषिकेश गावडे, मुख्य व्यवस्थापक (बँक ऑफ महाराष्ट्र, कुडाळ) बैजनाथ गुप्ता, वैभव पवार, नीलेश वालावलकर आदी उपस्थित होते.

ऋषिकेश गावडे यांनी, ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधीअंतर्गत बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी निकाली काढण्यासाठी विशेष जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे खातेदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळविण्याची संधी मिळणार आहे. दहा वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवीवर दावा केलेला नाही, अशा ठेवी ‘ठेवीदार शिक्षण व जागरुकता निधी’मध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. खातेदारांना अशा ठेवी परत मिळविण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सांगितले. मोहिमेच्या कालावधीत १०४ खात्यांमधील २२.७३ लाख रुपयांच्या दावा न केलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्यात आला. धैर्यशील परभणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Learn how to claim unclaimed money from RBI. Bank officials explain KYC process and your rights over inactive bank accounts

Unclaimed Money : आपला पैसा परत मिळवा! मोदी सरकार देत आहे बँक, विमा आणि म्युच्युअल फंडमधील विसरलेले पैसे, जाणून घ्या कसे मिळणार

केवायसी केली, तर राशी परत!

देवरे म्हणाले, ‘ज्यांनी दहा वर्षे खाते ऑपरेट केले नाही, अशांचा जमा झालेला पैसा रिझर्व्ह बँकेत आहे. ही राशी रिझर्व्ह बँकेत जमा करावी लागते. हक्काचा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे. केवायसी केली, तर तुमची राशी परत मिळते. आतापर्यंत आपल्या हक्काचा पैसा आपल्याला मिळावा, याकरिता फक्त दहा टक्के प्रगती झाली आहे. तुमचे पैसे तुम्हाला मिळावे, यासाठी रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांचा प्रामाणिक उद्देश आहे.’

Learn how to claim unclaimed money from RBI. Bank officials explain KYC process and your rights over inactive bank accounts

Income Tax Department : सावधान! तुमच्या या 10 व्यवहारांवर आयकर विभागाची कडक नजर; छोटी चूकही नोटीस आणू शकते!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com