Unclaimed Money
Sakal
Your Money, Your Right movement : देशात लाखो लोकांचे पैसे आजही ‘अनक्लेम्ड’ म्हणजेच दावा न केलेल्या अवस्थेत पडून आहेत. हे पैसे त्यांच्या खऱ्या मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता केंद्र सरकारकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. यासाठी ‘आपला पैसा, आपला हक्क’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना सांगितले की, Your Money, Your Right अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत ₹2,000 कोटी रुपये त्यांच्या खऱ्या मालकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.