कोळंबे कुंभारवाडीत अनोखे स्वामी समर्थ ध्यानमंदिर

कोळंबे कुंभारवाडीत अनोखे स्वामी समर्थ ध्यानमंदिर

Published on

rat२९p१.jpg-
२६O२०६३४
रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे येथील स्वामी समर्थ ध्यानमंदिराचे संकल्पचित्र.
rat२९p२.jpg-
२६O२०६३५
रत्नागिरी : कोळंबे कुंभारवाडी येथे स्वामी समर्थ ध्यानमंदिराचे काम पूर्णत्वास जात आहे.
-----
अनोख्या कळसामुळे लक्ष वेधणारे स्वामी समर्थ मंदिर
हिराकांत साळवी ः कोळंबे कुंभारवाडीत ध्यानधारणेसह भाविकांसाठी विशेष सुविधा
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : तालुक्यातील कोळंबे कुंभारवाडी येथे वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना असणारे श्री स्वामी समर्थ ध्यान (केंद्र) मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराच्या गाभारा, सभामंडपातून हत्तीच्या सोंडेवरील ताम्हणावरील शुभ कळस पाहता येणार आहे. मंदिराच्या तळमजल्यावर ध्यानधारणेची सुविधा भाविकांना करून दिली जाणार असून, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी व्हीलचेअवरून थेट स्वामींचे दर्शन घेता येईल, अशी माहिती स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख व बांधकाम व्यावसायिक हिराकांत साळवी यांनी ‘सकाळ’ला दिली.
कोळंबे-कुंभारवाडी येथे साळवी यांनी नऊ गुंठे जागा खरेदी करून स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली व त्या माध्यमातून स्वामींचे मंदिर उभे राहत आहे. या मंदिराला नुकतीच भेट दिली. त्या वेळी साळवी यांनी सांगितले की, मंदिराचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. १६ मार्च रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. स्वामी समर्थांची सव्वातीन फुटाची व्हिएतनाम मार्बलमधील मूर्ती, श्री गणपती, श्री विठ्ठल रखुमाई व संत श्री गोरोबा कुंभार यांची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाणार आहे.
मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यातून भाविकांना कळसाचे दर्शन होणार आहे, असे हे वेगळ्या धाटणीचे मंदिर ठरणार आहे. हत्तीच्या सोंडेवर ताम्हण आणि ताम्हणावर शुभ कलश असा याचा कळस असणार आहे. कलश बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंदिराच्या तळमजल्यावर साधारणपणे १५ ते २० भाविक बसून ध्यान करू शकतात. मंदिरात जिना असला तरी स्वामिभक्त ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना गाभाऱ्यात येण्याकरिता विशेष सोय करण्यात आली आहे. व्हीलचेअरवरून भाविक थेट गाभाऱ्यापर्यंत पोहोचू शकतात.
स्वामी समर्थांचे मंदिर बांधण्याचा उद्देश सांगताना साळवी म्हणाले, आमच्या घरी गेली अनेक दशके स्वामीसेवा नित्य सुरू आहे. स्वामींनी आम्हाला अनेकवेळा प्रचिती दिली आहे. माझा भाऊ, पत्नी यांना संकटातून तशी अनुभूती आली आहे. मंदिराचे काम पूर्णत्वास जात असताना भाविकांनीही मदत देऊ केली आहे. ट्रस्टने मंदिर उभारणीची जबाबदारी घेतली असली तरी स्वामिभक्तांनी मदत दिल्यास ती स्वीकारण्यात येणार आहे.
------
चौकट १
ग्राममंदिर ते गुरुमंदिर मिरवणूक
प्राणप्रतिष्ठापना सोहळा १६ मार्चला होणार आहे. तत्पूर्वी १४ला ग्राममंदिर श्री त्रिमुखी देवी मंदिर ते गुरूमंदिर-स्वामी मंदिरापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. १५ रोजी धार्मिक विधींचे आयोजन केले आहे.

-----
चौकट २
झाडे वाचवली
या मंदिराच्या बांधकामावेळी कोणतेही झाड तोडले नाही तर सर्व झाडे वाचवण्यात आली आहेत. मंदिराच्या आवारात सभामंडप उभारण्यात येत असून, तेथे एकाच वेळेस ५०० जणांची बसण्याची व्यवस्था होईल. हे मंदिर केवळ पूजेसाठी नव्हे तर ध्यान, साधना आणि आध्यात्मिक शांतीचे केंद्र ठरणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचे विचार समाजाला योग्य दिशा देणारे असून, त्यांच्या कृपेने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com