श्रावणी पांचाळासह समीक्षा पाटणकर चित्रकलेत प्रथम

श्रावणी पांचाळासह समीक्षा पाटणकर चित्रकलेत प्रथम

Published on

swt2911.jpg
20687
तळेरे ः वीरगाथा प्रकल्प – ५.० अंतर्गत चित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल श्रावणी पांचाळ हिचा प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्रावणी पांचाळ, समीक्षा पाटणकर
चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २९ ः शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने राबविण्यात आलेल्या वीरगाथा प्रकल्प – ५.० अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नववी ते दहावी गटातून श्रावणी पांचाळ हिने, तर अकरावी ते बारावी गटातून समीक्षा पाटणकर हिने चित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थिनींचा डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.
शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण तयारी यामुळेच हे यश शक्य झाले असून, शाळा केवळ शैक्षणिकच नव्हे तर सांस्कृतिक व कलात्मक विकासासाठीही सदैव प्रयत्नशील आहे. भविष्यातही विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विद्यार्थिनींना प्रशालेचे कलाशिक्षक पी. एन. काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समितीचे सर्व सदस्य, शिक्षकवृंद, माजी व आजी विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचे व प्रशालेचे विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com