‘होम मिनिस्टर’मध्ये ईशा बिडये अव्वल
20823
‘होम मिनिस्टर’मध्ये ईशा बिडये अव्वल
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३० ः येथील व्यापारी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात ईशा बिडये यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय शरयु पेडणेकर, तर तृतीय क्रमांक अस्मिता मोरये यांनी मिळविला.
नांदगाव व्यापारी संघटनेतर्फे श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभासह ‘होम मिनिस्टर-कोण जिंकणार पैठणी?’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पप्पी वायंगणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, उपाध्यक्ष गोपाळ मोरये, सचिव ऋषिकेश मोरजकर, खजिनदार दिलीप फोंडके, पंढरी वायंगणकर, राजेंद्र मोरजकर, कमलाकर महाडिक, रज्जाक बटवाले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल, तसेच माजी अध्यक्ष पप्पी सापळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली वाहण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, संजय देसाई, बुवा प्रकाश पारकर, उद्योजक संतोष पारकर, नांदगाव पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कासार्डे पेट्रोल पंपचे मालक श्री. पोकळे, तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, माजी अध्यक्ष दत्तात्रय कल्याणकर आदी उपस्थित होते. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे ऋषिकेश मोरजकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

