मुणगे-लब्देवाडी सडा येथे
त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम

मुणगे-लब्देवाडी सडा येथे त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम

Published on

20828

मुणगे-लब्देवाडी सडा येथे
त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ३० : येथील लब्देवाडी सडा येथे श्री गोपाळकृष्ण गोठण गवळदेव मंडळातर्फे उद्या (ता. ३१) त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मुणगे-लब्देवाडी, आडवळवाडी व आपईवाडी (आलीकडील मंडळी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सकाळी दहाला श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी बाराला आरती व तीर्थप्रसाद होणार आहे. सायंकाळी साडेसातला स्थानिक संगीत भजने, तर रात्री दहाला ‘जयघोष हरिनामाचा’ या कार्यक्रमांतर्गत दिंडीभजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ओम श्री पावणाई कला क्रीडा दिंडी भजन मंडळ, दाभोळे-मधलीवाडी (ता. देवगड) तसेच आई भगवती कला दिंडी भजन मंडळ, तोरसोळे (ता. देवगड) यांच्या दिंडीभजनाचा समावेश असणार आहे. या त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गोपाळकृष्ण गोठण गवळदेव मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com