

देवरूख परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
नगरपंचायतीला संसारे यांचे साकडे; हल्ल्याच्या पाच घटना
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः देवरूख नगरपंचायत क्षेत्रात सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या श्वानांनी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव संसारे यांनी केली आहे.
प्रशासनाकडे यंत्रणेचा अभाव या संदर्भात संसारे यांनी नगरपंचायतीच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून विचारणा केली असता, नगरपंचायतीकडे भटक्या किंवा पिसाळलेल्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्यातरी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सध्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवरूखच्या मुख्य बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला करण्याच्या आतापर्यंत सुमारे चार ते पाच घटना घडल्या आहेत. यामुळे बाजारपेठेतून ये-जा करणारे नागरिक, व्यापारी, नोकरदार वर्ग आणि विशेषतः शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकदा कुत्री अंगावर धावून येत असल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे.
नगरपंचायतीने केवळ निविदा प्रक्रियेचे कारण पुढे न करता नागरिकांच्या जीविताचा विचार करून तातडीने यावर उपाययोजना करावी आणि पिसाळलेल्या तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी संसारे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.