-टीईटी परीक्षा पुढे ढकला

-टीईटी परीक्षा पुढे ढकला

Published on

‘टीईटी’च्या परीक्षा पुढे ढकला
माध्यमिक अध्यापक संघाची मागणी ; जिल्हा परिषद निवडणुका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी केंद्रीय टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. ही परीक्षा पुढील आठवड्यात होणार आहे; परंतु त्याच वेळी निवडणुका, मतमोजणी असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने केली आहे.
याबाबतचे निवेदन माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील, सचिव रोहित जाधव, कार्याध्यक्ष संभाजी देवकते आणि राज्य उपाध्यक्ष भारत घुले यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पाठवले आहे.
राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमात बदल केला. त्यानुसार मतदान प्रक्रिया ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि मतमोजणी ७ ऐवजी ९ फेब्रुवारीला होणार आहे.
केंद्रीय टीईटी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ७ व ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक बसणार आहेत तसेच या परीक्षेचे केंद्र, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अशा महानगरामध्ये आहे. त्यामुळे रत्नागिरीतून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून परीक्षेपूर्वी एक दिवस आधी परीक्षाकेंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे; परंतु त्याच दिवशी निवडणूक होणार असल्याने सर्व शिक्षक निवडणूक कर्तव्यावर आहेत. त्यामुळे त्यांना टीईटीच्या परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com