पाट येथील देसाई विद्यालय रेखाकला स्पर्धेत चमकले
20865
पाट येथील देसाई विद्यालय
रेखाकला स्पर्धेत चमकले
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३० ः पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयाने शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली. या परीक्षेत एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही स्तरांत मिळून ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
एलिमेंटरी परीक्षेसाठी ५८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये १२ विद्यार्थ्यांनी ‘बी’ श्रेणी मिळविली असून धनिशा परब आणि विघ्नेश खोत यांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त करून विशेष यश प्राप्त केले. इंटरमिजिएट परीक्षेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून १० विद्यार्थी ‘बी’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. अंतरा केरकर, धनदा सावंत, दिशा सामंत, जागृती राऊळ, कल्पित परब, मिहीर मिस्त्री आणि स्वरांगी सर्वेकर यांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त करत विद्यालयाच्या यशात भर घातली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर, गुरुनाथ केरकर, जान्हवी पडते व दीपिका सामंत यांच्या हस्ते गुलपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

