गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच उज्ज्वल भविष्य
20872
गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच उज्ज्वल भविष्य
लखमराजे भोसले ः नेमळे विद्यालयाचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः सध्याच्या काळात ग्रामीण भागात शाळा चालविणे आव्हानात्मक झाले असून, विद्यार्थ्यांनी नोकरी मिळेल व आयुष्य उज्ज्वल होईल असे गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन युवराज लखमराजे भोसले यांनी केले.
नेमळे येथील विद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी श्री. भोसले यांचा सत्कार केला. श्री. राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात श्री. भोसले यांच्या हस्ते (कै.) तात्यासाहेब पोकळे आदर्श समाजभूषण पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते हणमंत देसाई ऊर्फ अण्णा देसाई यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. तसेच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, वजराट नं. १ (ता. वेंगुर्ला) येथील उपक्रमशील शिक्षक तेजस बांदिवडेकर यांना प्रदान करण्यात आला. प्रमिला शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उपक्रमशील आदर्श शिक्षिका पुरस्कार जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सरस्वती विद्यालय, कालेली नं. १ (ता. कुडाळ) येथील सौ. शामल धुरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी विविध क्षेत्रांत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविले. तसेच दहावीतील आदित्य परब, भार्गवी आळवे आणि बारावीतील सर्वेश होडावडेकर, निधी धुरी यांची आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थीनी म्हणून निवड करण्यात आली. श्री. राऊळ यांनी, संस्थेच्यावतीने दिले जाणारे सर्व पुरस्कार काटेकोर मूल्यमापन करूनच प्रदान केले जातात. चंदनाप्रमाणे झिजून समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो, असे सांगितले. यावेळी समाजभूषण पुरस्कारप्राप्त हणमंत देसाई, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त तेजस बांदिवडेकर व आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त सौ. शामल धुरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास मुख्यकार्यकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर, सचिव स. पा. आळवे, तुकाराम गुडेकर, आनंद नेमळेकर, महादेव राऊळ, श्रीकृष्ण म्हाडेश्वर, केंद्रप्रमुख विठ्ठल तुळसकर, चंद्रकांत धुरी, रवळनाथ पाटील, रवी घोगळे, सुभाष धुरी, रामचंद्र जाधव, एकनाथ आरोलकर, उमेश राऊळ, सदानंद पेंडसे, एम. पी. सारंग, चंद्रकांत बंगाल, क्रांती मयेकर, नेहा कोंडये, दिलीप मेस्त्री, तुकाराम घोगळे, सगुण नेमण, कासार मॅडम आदी उपस्थित होते. प्राचार्य आर. के. राठोड यांनी प्रास्ताविक केले. राजेश गुडेकर यांनी अहवाल वाचन केले. पांडूरंग दळवी, नितीन धामापूरकर व बरागडे मॅडम यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. लवू जाधव यांनी आभार मानले.
------------------
‘नेमळे पंचक्रोशी’ प्रेरणादायी संस्था
नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था ही जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त शैक्षणिक संस्था असून, समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार व उत्कृष्ट अध्यापनातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांत यश मिळवून देणाऱ्या शिक्षकांना उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यास प्रेरणा देणारी संस्था आहे, असे गौरोवोद्गार युवराज लखमराजे भोसले यांनी यावेळी काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

