महाविद्यालयीन शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षांकडे वळा
-rat३१p५.jpg-
२६O२१०५०
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात प्रा. सुभाष मायंगडे यांचे स्वागत करताना प्र. प्राचार्य मधुरा पाटील. सोबत प्रा. वसुंधरा जाधव, प्रा. राखी जाधव, प्रा. हर्षदा लिंगायत आदी.
------
विद्यार्थ्यांनो प्रशासकीय सेवेत करिअर घडवा
सुभाष मायंगडे ः स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर बँकिंग परीक्षांचा अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेत वेळेचे नियोजन आणि अवांतर वाचन महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीधर न होता काळाची गरज ओळखून प्रशासकीय सेवांमध्ये आपले करिअर घडवावे, असे प्रतिपादन प्रा. सुभाष मायंगडे केले.
देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळेत ते बोलत होते. स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन आणि तयारीसाठी उपलब्ध असलेले विविध स्रोत या विषयी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्र. प्राचार्या मधुरा पाटील, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वसुंधरा जाधव, ऋतुजा भोवड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. राखी जाधव, प्रा. हर्षदा लिंगायत यावेळी उपस्थित होत्या. शिवानी पाटील यांनी सूत्रसंचालन, साईराज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तन्वी पटवर्धन हिने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

