कास दाभाळवाडी परिसरात बिबट्याचा मुक्तपणे संचार
कास दाभाळवाडी परिसरात
बिबट्याचा मुक्तपणे संचार
तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३१ : कास-दाभाळवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रोज सायंकाळपासून सकाळपर्यंत बिबट्या या परिसरात मुक्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे. या भागात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून, अनेकवेळा मांजरी किंवा शेळ्यांना त्याने आपले भक्ष्य बनविले आहे. बिबट्याच्या या सततच्या वावरामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले आहे.
याबाबत कास ग्रामपंचायतीचे सदस्य अजय भाईप यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ एकदाच परिसरात फेरी मारली आणि त्यानंतर मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ग्रामस्थांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वनविभागाकडून फोन उचलले जात नाहीत, असेही त्यांनी सांगितले. जर या परिसरात एखादी जीवितहानी झाली, तर त्याला जबाबदार कोण असणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वनविभागाने थातूरमातूर कारवाई न करता दाभाळवाडी परिसरातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ ठोस निर्णय घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

