वीज वाहिनी बदलण्याचे काम कलमठ पिंपळपार येथे सुरू
21190
वीज वाहिनी बदलण्याचे काम
कलमठ पिंपळपार येथे सुरू
कणकवली, ता. १ : कलमठ (ता. कणकवली) येथील पिंपळपार मंदिराच्या सभा मंडपावरून गेलेली वीज वाहिनी बदलण्याचे काम ‘महावितरण’ने आज सुरू केले. त्यामुळे कलमठवासीयांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
कलमठ पिंपळपार सभामंडपावरून उच्च दाबाची वीज वाहिनी गेली होती. वादळ, तसेच पावसाळ्याच्या कालावधीत या वीजवाहक तारा सभा मंडपाला लागल्या तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे सभा मंडपावरील वीजवाहक तारा हटवाव्यात, अशी मागणी इथल्या लोकप्रतिनिधींनी केली होती. कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी याअनुषंगाने २६ जानेवारी रोजी उपोषण केले होते. ३१ जानेवारीपूर्वी सभामंडपावरील वीज वाहिनी हटविण्यात येईल, अशी ग्वाही उपोषणकर्ते धीरज मेस्त्री यांना ‘महावितरण’कडून देण्यात आली होती. त्यानुसार आजपासून ‘महावितरण’ने येथील वीज वाहिन्या काढून त्या अन्य भागातून नेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

