रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतचे ८० टक्के काम पूर्ण

रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतचे ८० टक्के काम पूर्ण

Published on

- rat१p११.jpg-
युद्धपातळीवर
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम युध्दपातळी सुरू आहे.
- rat१p१२.jpg-
२६O२११८६
आंबा घाटातील कामाची स्थिती
----
रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतचे ८० टक्के काम
मुदतवाढीची शक्यता ; उर्वरीत काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणे अवघड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम आता प्रगत टप्प्यावर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील मिऱ्याबंदर ते आंबा घाटापर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले असून, मे २०२६ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र, उर्वरित कामाचा आवाका पाहता संबंधित ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.
महामार्गावरील आंबा ते चोकाक दरम्यानचे काम आतापर्यंत ६३ टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यात मोठे डोंगर फोडून उड्डाणपूल बांधले जात आहेत, तसेच मार्गातील तीव्र वळणे काढली जात आहेत. या तांत्रिक कामांमुळे प्रकल्पास विलंब होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मे अखेरपर्यंतची मुदत असली, तरी काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन महिने मुदतवाढ मिळू शकते, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पावसाळ्यात आंबा घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. पर्यटकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सध्या आंबा घाटात दोन्ही बाजूंना संरक्षक जाळ्या लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील रत्नागिरी मिऱ्याबंदर ते आंबापर्यंतच्या कामात आता केवळ किरकोळ कामे शिल्लक राहिली आहेत.
दरम्यान, नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता यापूर्वीच पूर्ण झाला आहे, मात्र सांगली ते कोल्हापूर टप्प्यातील काम काहीसे रखडले होते. आता चोकाक परिसरातील भूसंपादनाचा तांत्रिक पेच सुटल्याने या कामालाही गती मिळणार आहे. चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
-----
चौकट
दोन ठिकाणी होणार टोल वसुली
महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली सुरू केली जाईल. यासाठी पन्हाळा तालुक्यातील ‘आवळी’ आणि हातकणंगले तालुक्यातील ‘शिरोली-बसवनखिंड’ येथे टोलनाके उभारले जाणार आहेत. रस्ता पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतरच या दोन्ही नाक्यांवरून अधिकृत वसुली सुरू होईल.
-----
चौकट
प्रवास होणार सुसाट
आंबा ते पैजारवाडी (४५ किमी) आणि पैजारवाडी ते चोकाक (३२ किमी) असा एकूण ७७ किलोमीटरचा रस्ता २०२३ पासून निर्माणाधीन आहे. तब्बल ४५ मीटर रुंदीचा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर ते नागपूर हा प्रवास अत्यंत वेगवान आणि सुखकर होणार आहे. अतिवृष्टी आणि मध्यंतरीच्या भूसंपादनाच्या अडचणींमुळे कामाला थोडा विलंब झाला असला, तरी आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com