चिखलगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

चिखलगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
Published on

चिखलगाव येथे गुणवंतांचा सन्मान
लोकमान्य टिळक विद्यामंदिर ; तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १ ः चिखलगाव येथील लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमधील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
चिखलगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर, ग्रुप ग्रामपंचायत देवके-किन्हळ-चिखलगावचे सरपंच व संस्थेचे विश्वस्त दिनेश आडविलकर, मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश नाचणेकर, आयबीटी विभाग प्रमुख शैलेश खुळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक आलेखाचे सादरीकरण केले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळेने राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा आणि निकालांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. या कार्यक्रमात पहिली ते बारावीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धा, परीक्षा आणि सहशालेय उपक्रमांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मेडल आणि आकर्षक पारितोषिके देण्यात आली.
याप्रसंगी डॉ. राजा दांडेकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. ते म्हणाले, सातत्य, अपार परिश्रम आणि शिस्त हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या स्पर्धेत न पडता अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com