मंडणगडात संत रविदास महाराज जयंती साजरी
- rat१p१६.jpg-
२६O२१३१८
मंडणगड ः संत रविदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करताना मुख्याध्यापक आप्पासाहेब हुलगे, शिक्षक.
----
मंडणगडात संत रविदास महाराज जयंती
मंडणगड, ता. १ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड येथे संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे वरिष्ठ लिपिक विलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रकाश हेलोंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी संत रविदास महाराज यांच्या भक्ती चळवळीविषयी माहिती देताना समता, मानवता, जात-पात विसरून माणुसकी जपण्याचा संदेश त्यांनी समाजाला दिल्याचे नमूद केले. मन शुद्ध असेल तर तीर्थाची गरज नाही, हा त्यांचा विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी यांनी संत रविदास महाराज यांचा जन्म, जीवनप्रवास व सामाजिक कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

