इएसआयसी नोंदणीकृत कर्मचाऱ्यांवर मोफत उपचार
- rat६p३.jpg-
२६O२२४६४
चिपळूण ः सेवा दवाखान्याच्या प्रारंभप्रसंगी अधिकारी व उद्योज संघटनेचे पदाधिकारी.
-----
लोटेत ईएसआयसी रुग्णालय सुरू
नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसह, कुटुंबावर मोफत उपचार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः लोटे येथे ईएसआयसी सेवा दवाखान्याचे प्राथमिक केंद्र सुरू करण्याची मागणी लोटे परशुराम इंडस्ट्रिज असोसिएशनने सातत्याने केली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत तत्काळ दखल घेतली व तशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार लोटे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सेवा दवाखान्याचे प्राथमिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे ईएसआयसी नोंदणीकृत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार घेता येणार आहेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) कायदा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना २०२३ पासून लागू झाला आहे. त्यानंतर, सर्वांना ईएसआयसीअंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक केले होते. त्यानंतर बहुतांशी कंपन्यांनी व कंपनीमधील ठेकेदारांनी तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांची ईएसआयसीअंतर्गत नोंदणी केलेली आहे; परंतु लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीनजीक ईएसआयसीचे प्रायमरी सेंटर नसल्याने या सेवेचा लाभ घेण्यास कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. ईएसआयसी सेवा दवाखाना सुरू करण्यासाठी लोटे परशुराम उद्योजक संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच परिसरातील मोठ्या दवाखान्यांसोबत ईएसआयसी दवाखाना जोडण्यासाठी प्रयत्न केले तसेच हा दवाखाना लोटेनजीकच होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. लोटेतील घरडा व परशुराम हॉस्पिटल, चिपळूण येथील डेरवण हॉस्पिटल यांना द्वितीय व तृतीय दर्जाच्या उपचारांकरिता ईएसआयसीला जोडण्यात आले आहे; परंतु प्राथमिक उपचार सेवाकेंद्र नसल्याने कर्मचाऱ्यांना रत्नागिरी येथे जाऊन रेफरल लेटर आणावे लागत होते. त्यामुळे कामगारांची खूपच गैरसोय होत होती. याचा कोणताही फायदा कामगारांना घेता येत नव्हता; मात्र आता हा दवाखाना सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
ईएसआयसीच्या उद्घाटनावेळी लोटे परशुराम इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, संघटनेचे सचिव राजकुमार जैन, संचालक शिरिष चौधरी, संकेत मेहता, घरडा फाउंडेशनचे सतीश वेंगुली, गोपाल थंपी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ कोल्हापूरचे अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी, इतर मान्यवर, उद्योजक, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यवस्थापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

