राजापुरात १५ ग्रामपंचायतीत २१ जागांसाठी होणार निवडणूक

राजापुरात १५ ग्रामपंचायतीत २१ जागांसाठी होणार निवडणूक
Published on

राजापुरात १५ ग्रामपंचायतीत
२१ जागांसाठी होणार निवडणूक

एप्रिलमध्ये धुरळा; ऐन उन्हाळ्यात राजकारण तापणार

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः पुढील महिन्यामध्ये तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींतील २१ जागांसाठी पोटनिवडणुकीचा धुरळा उडणार आहे. यामुले येत्या महिन्यातील रखरखत्या भरउन्हामध्ये या गावांतील राजकारण तापणार आहे.
विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कोळवणखडी प्रभाग-१ (सर्वसाधारण), प्रभाग-२ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), नाणार प्रभाग-१ (नामप्र महिला), झर्ये प्रभाग-२ (अनुसूचित जाती), प्रभाग-२ (नामप्र महिला), वडदहसोळ प्रभाग-३ (नामप्र महिला), येळवण प्रभाग-३ (अनसूचित जाती), हातिवले प्रभाग -३ (सर्वसाधारण महिला), खरवते प्रभाग-२ (सर्वसाधारण महिला), केळवली प्रभाग-२ (सर्वसाधारण महिला), प्रभाग-३ (सर्वसाधारण महिला), केळवली प्रभाग-४ (सर्वसाधारण महिला), माडबन प्रभाग-३ (सर्वसाधारण महिला), भालावली प्रभाग-१ (सर्वसाधारण), कळसवली प्रभाग-३(सर्वसाधारण), प्रभाग-३ (सर्वसाधारण महिला), कोंड्येतर्फ सौंदळ प्रभाग-२ (नामप्र महिला), कोंड्येतर्फ सौंदळ प्रभाग-३ (सर्वसाधारण), साखर प्रभाग-३ (नामप्र), प्रिंदावण प्रभाग-२ (सर्वसाधारण), धाऊलवल्ली प्रभाग-३ (सर्वसाधारण) अशा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमधील २१ जागांचा समावेश आहे. ७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून या पोटनिवडणुकीला सुरुवात होणार आहे. आवश्यकता भासल्यास २८ एप्रिलला मतदान होणार असून, २९ ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावागावांतील राजकीय वातावरण तापणार असून, संभाव्य उमेदवारांचा शोध घेण्याची मोहीम राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे.

चौकट
निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज - ७ ते १३ एप्रिल
अर्ज छाननी - १५ एप्रिल
अर्ज मागे घेणे - १७ एप्रिल
मतदान - २८ एप्रिल
मतमोजणी - २९ एप्रिल

चौकट ः

महिला उमेदवार शोधण्याचे आव्हान
पुढील महिन्यामध्ये पंधरा ग्रामपंचायतींतील २१ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत २१ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी राखीव आहेत. आधीच महिला उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहिलेल्या या जागांसाठी पुन्हा पोटनिवडणूक होत असून, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा या जागांसाठी महिला उमेदवारांचा शोध घेण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर ठाकले आहे. पोटनिवडणुका होत असलेल्या जागांवर महिला उमेदवार न मिळाल्यास पुन्हा एकदा या जागा रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com