देवली-परबवाडीतील ‘तो’ प्रकार ‘मेगाक्रायोमेटोर’

देवली-परबवाडीतील ‘तो’ प्रकार ‘मेगाक्रायोमेटोर’
Published on

36918

देवली-परबवाडीतील ‘तो’ प्रकार ‘मेगाक्रायोमेटोर’

घरावर बर्फाचा गोळा; वातावरणातील बदलाचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता.११: देवली-परबवाडी (ता.मालवण) येथे दोन दिवसांपूर्वी विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर अचानक ५ किलो वजनाचा एक बर्फाचा गोळा कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी हा गोळा पडला तेव्हा आकाशात पावसाचे ढग नव्हते की कोणतेही वादळ नव्हते. हवामानशास्त्रात या दुर्मिळ घटनेला ‘मेगाक्रायोमेटोर’ असे संबोधले जाते असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
दुपारच्या सुमारास देऊलकर यांच्या घरावर मोठा आवाज झाला. पाहणी केली असता छतावर बर्फाचा एक मोठा तुकडा दिसून आला. या बर्फाच्या गोळ्याचे वजन सुमारे ५ किलो होते. निळेशार आकाश असताना अचानक असा बर्फाचा गोळा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गोळ्याचे निरीक्षण केले असता, त्यात बर्फाचे अनेक लहान थर एकमेकांना चिकटलेले दिसून आले.
---
दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना
याबाबत हवामान अभ्यासक प्रा. हसन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक अत्यंत दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना आहे. सध्या भारतात उष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह आणि पूर्वीय जेट प्रवाह हे दोन्ही एकाच वेळी सक्रिय झाले आहेत. ही एक दुर्मिळ स्थिती आहे. उंचावर असलेला पश्चिमेकडील जेट प्रवाह जमिनीवरील आर्द्र हवा स्वतःकडे खेचून घेतो. जेव्हा ही हवा उंचावरील अतिथंड हवेच्या संपर्कात येते, तेव्हा ती वेगाने गोठते आणि मोठ्या बर्फाच्या गोळ्याचे रूप घेते. हे गोळे साधारण १० ते १२ किलोमीटर उंचीवरून खाली पडतात. खाली पडताना त्यांचा वेग ताशी १५० ते २०० किलोमीटर इतका असू शकतो.
---
यंदा मॉन्सून लांबण्याची भीती
तज्ज्ञांच्या मते, पश्चिमेकडील जेट स्ट्रीम अजूनही दक्षिणेकडे आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. जोपर्यंत हा प्रवाह हिमालयाच्या उत्तरेला सरकत नाही, तोपर्यंत मॉन्सून सक्रिय होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे यावर्षी मॉन्सून लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
------------
निसर्गातील मानवी हस्तक्षेपाचा परिणाम
ही घटना म्हणजे वाढत्या जागतिक तापमानवाढीचा आणि निसर्गातील मानवी हस्तक्षेपाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्याने जेट स्ट्रीम्स आपली शक्ती गमावत असून ‘ब्लॉकिंग पॅटर्न’मुळे अशा विसंगत घटना घडत आहेत. निसर्ग अशा बदलांमधून मानवाला भविष्यातील मोठ्या संकटाची पूर्वसूचना देत असल्याचे प्रा. खान यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com