

- rat४p६.jpg-
26O41255
रत्नागिरीतील जिजामाता उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा.
रत्नागिरी बनतेय सांस्कृतिक पर्यटन केंद्र
किनाऱ्यापलीकडे ओळख; शहराच्या अर्थचक्राला गती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी ता. ४ : निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याने पर्यटनक्षेत्रात कात टाकली आहे. गेल्या वर्षभरात शिवसृष्टीला २० हजार पर्यटकांनी पसंती दिली तर लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थान स्मारकास भेट देणाऱ्यांची संख्या आता लाखांच्या घरात पोहोचली आहे. मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची ओढ जिजामाता उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे अधिक आहे. गेल्या वर्षभरात ५० हजार पर्यटकांनी या उद्यानाला भेट दिली. पुतळ्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘म्युरल्स’ प्रदर्शनातून जिवंत होणाऱ्या महाराजांच्या जीवनाच्या इतिहासाने पर्यटक भारावून जात आहेत.
ऐतिहासिक आणि शैक्षणिक प्रकल्पांमुळे रत्नागिरीची ओळख केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरती मर्यादित न राहता एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र म्हणूनही दृढ होत आहे. गेल्या काही वर्षांत नियोजनबद्धरीत्या विकसित करण्यात आलेल्या विविध पर्यटनस्थळांमुळे केवळ पर्यटकांचा ओघच वाढला नाही तर स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचे साधनही निर्माण झाले आहे. केरळ आणि काश्मीरच्या धर्तीवर शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या विशेष पुढाकारातून शहरात शिवसृष्टी, अद्ययावत मल्टिमीडिया थ्रीडी शो, तारांगण आणि जिजामाता उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा ही प्रेक्षणीय स्थळे आकारास आली आहेत. ही मुख्य आकर्षणे ठरत आहेत.
----
साऱ्यांना होतोय फायदा
पर्यटनाच्या या विकासामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांमुळे हॉटेल व्यवसाय, लॉजेस आणि पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. रिक्षाचालकांपासून ते खासगी वाहनचालकांपर्यंत सर्वांच्याच उत्पन्नात वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.