

सह्याद्रीत १,५६६ वन्यजीवांची नोंद
पाणथळ प्राणी पाहणी; पाच बिबट्यांचे पुरावे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यजीव अभयारण्य राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात पाणथळावरील प्राणी पाहणी निसर्ग अनुभवाअंतर्गत यंदा तब्बल एक हजार ५६६ वन्यप्राणी, पक्षी आणि अन्य जैवविविधतेची नोंद झाली. त्यात ३२४ मचाणांवरून ७७५ वनकर्मचारी व २२८ निसर्गप्रेमींनी निरीक्षणात सहभाग घेतला. त्यात पाच बिबट्यांचे पुरावे आढळले.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. चंद्रप्रकाशात वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ती वेळ निवडण्यात आली. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. पक्ष्यांमध्ये हरियाल, नाईटजार, खंड्या, घार, कोकीळ, बुलबूल, सातभाई, पोपट, मोर, घुबड व पारवा आदी प्रजाती दिसून आल्या तसेच धामण, नाग, घोणस, अजगर, सरडा आणि घोरपड या सरपटणाऱ्या प्राण्यांचीही नोंद झाली. याशिवाय, सुमारे १०० फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद घेण्यात आल्याने परिसरातील समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.
....
निरीक्षणात आढळलेले प्राणी
* गवे : ३४७
* सांबर : २४०
* चितळ : १६५
* अस्वल : ३२
* भेकर : २३
* मुंगूस : १८
* रानकुत्रे : २९
* उदमांजर : ७
* शेकरू : २३
* रानमांजर : ३
* रानडुक्कर : १८
* ससे : २७
* रानम्हशी : ७१
* माकडे : ६१
* साळींदर : १८ यांसह अन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.