साई रिसॉर्टप्रकरणी आरोपपत्र दाखल

साई रिसॉर्टप्रकरणी आरोपपत्र दाखल

‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात
ईडीकडून आरोपपत्र
अनिल परब यांच्या अडचणीत भर
मुंबई, ता. ८ : दापोलीमधील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात आज ईडीच्या वतीने विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला असून परब यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले आहेत. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम, जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे. परब यांना तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. उद्या (ता. ९) यावर सुनावणी होणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाहीरपणे परब यांच्यावर या प्रकरणात आरोप केले आहेत. सोमय्या वारंवार पत्रकार परिषद घेऊन अनेक कागदपत्रे यामध्ये जाहीर करत असतात. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानेदेखील या रिसॉर्टवर कारवाई केली आहे. परब यांनी सातत्याने या प्रकरणात माझा संबंध नाही, असे जाहीर केले असले, तरी ईडीने त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यावर सर्वांना भूमिका विचारण्यात येते. त्यानंतर न्यायालय आरोप निश्चित करते आणि मग खटल्याला प्रारंभ होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com