महामार्गावर जीपमधील प्रवाशांची लूटमार

महामार्गावर जीपमधील प्रवाशांची लूटमार

दापोलीतील प्रवाशांना
मारझोड करून लुबाडले
पेणनजीक प्रकार; साडेचार लाखांचे दागिने पळविले
पेण, ता. १३ : पेण तालुक्यातील आंबिवली येथे मुंबई-गोवा महामार्गावरून आज पहाटे मुंबईच्या दिशेने जीपमधून जाणाऱ्या प्रवाशांना मारझोड करत लूटमार करण्यात आली. लूटमारीत प्रवाशांचे साडेचार लाखांचे दागिने चोरत तरुण पसार झाले. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून जीप (एमएच ०६ एझेड १४५१) मधून एका कुटुंबातील सहा जण दापोलीवरून मुंबईकडे प्रवास करत होते. आंबिवली फाट्यानजीक पहाटे पावणेतीनच्या सुमारास जीप आली असता मोटारीतून आलेल्या तरुणांनी त्यांच्या जीपच्या काचेवर दोन दगड मारून त्यांना शिवीगाळ केली. घाबरलेल्या चालकाने जीप पुढे नेली असता समोरून तीन वाहनांतून आलेल्या जवळपास १२ ते १५ तरुणांनी त्यांना अडवून मारझोड, शिवीगाळ करून प्रवाशांच्या अंगावरील सुमारे चार लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून पळ काढला.
जीपमधील घाबरलेल्या प्रवाशांनी पनवेल गाठत स्थानिक पोलिसांना घडलेली हकिगत सांगितली. पोलिसांनी शोध घेतला असता संशयित आरोपी पळून गेल्याचे समोर आले. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित गोळे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com