Complaint against unauthorized construction of Anganwadi
Complaint against unauthorized construction of AnganwadiSakal

Mangaon News : अंगणवाडीच्‍या अनधिकृत बांधकाम विरोधात तक्रार

माणगाव तालुक्यातील साई गावामध्ये शासनदप्तरी एका विशिष्ट समाजाच्या नावावर असलेल्या जागेमध्ये अंगणवाडीचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. शिवाय या बांधकामासाठी सदर समाजाची व ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याने संबंधित समाज आक्रमक झाला आहे.

माणगाव : माणगाव तालुक्यातील साई गावामध्ये शासनदप्तरी एका विशिष्ट समाजाच्या नावावर असलेल्या जागेमध्ये अंगणवाडीचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. शिवाय या बांधकामासाठी सदर समाजाची व ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याने संबंधित समाज आक्रमक झाला आहे.

सदर बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे, याकरता समाजाने शासनदरबारी धाव घेतली आहे. येथील साई बौद्ध वाडीत समाजाच्या नावावर १४ गुंठे जागा आहे. या जागेवर एका अंगणवाडीचे अनधिकृत बांधकाम सुरू असून साई ग्रामपंचायतीचीदेखील परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी सदरील समाज आक्रमक झाला असून याप्रकरणी त्‍यांनी अलिबाग येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्‍याकडे तक्रार केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com