पत्नीचा विरह झाला नाही सहन,  पतीने संपवले जिवन !
Kokan news पत्नीचा विरह झाला नाही सहन, पतीने संपवले जिवन !sakal

पत्नीचा विरह झाला नाही सहन, पतीने संपवले जिवन !

दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन; आकेगव्हाण गावाच्या हद्दीत संपवले जिवन

Manor News: पत्नीच्या मृत्यूनंतर एकटेपणा सहन न झालेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता. ९) उघडकीस आला. किराट नानिवली रस्त्यावरील आकेगव्हाणजवळ रस्त्यालगत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. काशीराम गणपत कडू (वय ४५) असे मृत पतीचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील धानिवरी येथील रहिवासी होता. (raigad news )

पत्नीचा विरह झाला नाही सहन,  पतीने संपवले जिवन !
Raigad Constituency Lok Sabha Election Result: अजित पवारांचा एकमेव सुभेदार रायगडमध्ये विजयी! अस्तित्वाच्या लढाईत गितेंचा पराभव

डहाणूमधील धानिवरीच्या बिदलपाड्याचे रहिवासी असलेले काशीराम कडू यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते. त्यांना एकेटपणा सहन न झाल्याने गुरुवारी (ता. ६) मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यालगच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या भावाने पोलिसात या घटनेची नोंद केली. (kokan news )


आणखी दोन अनोळखी मृतदेह


मनोर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत सातिवली आणि बोट गावाच्या हद्दीत दोन अनोळखी महिलांचे मृतदेह आढळून आले होते.

पत्नीचा विरह झाला नाही सहन,  पतीने संपवले जिवन !
Pune Cyclist Death : 'आता आमचे अण्णा कधीच घरी येणार नाहीत...'; सायकलस्वाराच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर कोसळलं आभाळ

२९ फेब्रुवारी रोजी बोट गावाच्या हद्दीतील जांभूळ पाड्यालगत वैतरणा नदीजवळ. तर सातिवलीच्या हद्दीत २४ एप्रिल महामार्गालगत असलेल्या पडीक गोडाऊनमध्ये ५० ते ५५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतदेहांबाबत माहिती असल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी केले आहे.(Latest Marathi News)

पत्नीचा विरह झाला नाही सहन,  पतीने संपवले जिवन !
Mumbai Local Crime: लोकलमधुन सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मोबाईल फोन खेचला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com