किचन गार्डन कार्यशाळा

किचन गार्डन कार्यशाळा

लोगो

किचन गार्डन कार्यशाळा
पुणे, ता. १८ ः किचन गार्डनद्वारे भाजीपाला, सक्युलंन्ट्स व कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडे व इतर पिके व झाडे पिकवता येतात. रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला व शोभेची इतर झाडे घरच्या घरी कशी पिकवू शकतो याबाबत माहिती देणारी कार्यशाळा शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) होणार आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, अन्न सेवनाचे प्रमाण, वैद्यकीय फायदे, आर्थिकदृष्ट्या लागवड कशी करावी, लागवडीसाठी आवश्यक प्रकाश, जागा, पाणी, रोपे, वनस्पती पोषण याविषयी माहिती दिली जाणार आहे. यामध्ये प्रात्यक्षिक अनुभवासाठी व्हिजिटेबल स्टार्टर सीड किट मोफत दिली जाणार आहे. तसेच सर्व प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला पिकवणाऱ्या किचन गार्डनला फिल्ड व्हिजिट आयोजिली आहे.

शिका आरोग्यदायी ग्लुटेन फ्री केक
आरोग्याच्या दृष्टीतून ग्लुटेन फ्री केकचे महत्त्व खूप आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात केक तयार करताना योग्य स्वच्छता राखली जात नाही व केकसाठी जो कच्चा माल वापरला जातो तो निकृष्ट दर्जाचा वापरलेला असू शकतो व त्याने आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक दृष्टीतून घरीच ग्लुटेन फ्री केकचे विविध प्रकार शिकवणारी कार्यशाळा शनिवारी (ता. २०) होणार आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व नाचणीचे पीठ वापरून करता येणारे केकचे प्रकार शिकवण्यात येतील. फ्रूट, खजूर, मावा, पंचामृत, मँगो ड्रायफ्रूट, पमकिन, कॅरेट मलाई, मिलेट्स, उपवास स्पेशल, टी टाईम स्पेशल हे केकचे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील. त्याचप्रमाणे केकचे प्रिझर्वेशन, बेकिंग, सद्य:स्थितीत असलेली मागणी, मार्केटिंग, पॅकिंग व कॉस्टिंग याच्या नोट्स पुरवल्या जातील.

शिका आरोग्यदायी बिस्किट व कुकिज
आरोग्याच्या दृष्टीने मैदाविरहित पदार्थांचे महत्त्व खूप आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक दृष्टीतून घरीच मैदाविरहित बिस्किट व कुकिजचे विविध प्रकार शिकवणारी कार्यशाळा रविवारी (ता. २१) होणार आहे. यामध्ये सद्य:स्थितीत बिस्किट व कुकिज व्यवसायाला असणारी मागणी, नावीन्यपूर्ण पद्धती आणि अतिशय पौष्टिक अशा विविध प्रकारच्या कुकिज कशा तयार करायच्या याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये गहू, नाचणी, मिलेट्स, बाजरी, ड्रायफ्रूट, नमकीन, जिरा, उपवासाचे, हैदराबादी, शुगर फ्री बिस्किटसह हेल्दी कुकिज व नानकटाई हे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील. त्याचप्रमाणे मार्केटिंग, पॅकिंग व कॉस्टिंगच्या नोट्स पुरवल्या जातील.

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१.
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com