Toll Plaza Case : 'मनसे'च्या 14 पदाधिकाऱ्यांची प्रत्येकी 50 हजाराच्या जामिनावर सुटका; टोलनाका तोडफोड प्रकरण भोवलं

न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराच्या जामिनावर सुटका केली.
Toll Plaza Case
Toll Plaza Caseesakal
Summary

महामार्गावर जेसीबीच्या काचा फोडून काहींना पळ काढल्याची दुसरी तक्रार दाखल करण्यात आली.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) रखडलेल्या कामाविरुद्ध दोन ठिकाणी तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी मनसेच्या (MNS) १४ जणांना वेगवेगळ्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची प्रत्येकी ५० हजाराच्या जामिनावर सुटका केली.

Toll Plaza Case
G Parameshwar : काँग्रेस सरकार 5 वर्षे टिकणार, भाजपचेच काही आमदार आमच्या संपर्कात; गृहमंत्र्यांचा मोठा दावा

चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे खानू येथील कार्यालय रात्री अज्ञातांनी फोडले. शुक्रवारी दुपारी पाली येथील जेसीबीची तोडफोड केल्याचा प्रकार पुढे आला आहे. कार्यालयाच्या सिक्युरिटी गार्ड संभाजी सुवारे (रा. खानू, रत्नागिरी) याने दिलेल्या तक्रारीनंतर केबिनच्या व कंटेनर ऑफिसच्या खिडकीच्या काचा लाकडी दांडक्याने फोडताना अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत.

समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओतही नासधूस करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घोषणा देत असल्याचेही दिसत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. दुपारी महामार्गावर पाली उभीधोंड येथे रस्त्याचे काम करत असलेल्या जेसीबीच्या काचा फोडून काहींना पळ काढल्याची दुसरी तक्रार दाखल करण्यात आली. या आधारे पोलिसांनी मनसेच्या १४ जणांवर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले.

Toll Plaza Case
Mumbai-Goa Highway : टोलनाका तोडफोड प्रकरण भोवलं; मनसेच्या 14 पदाधिकाऱ्यांना अटक

यामध्ये अद्वैत सतीश कुलकर्णी (रा. अभ्युदय नगर), अविनाश धोंडू मौंदळकर (नाचणे रोड, रत्नागिरी), रूपेश श्रीकांत चव्हाण (कोकण नगर), राजू शंकर पाचकुडे (नरबे करबुडे), विशाल चव्हाण (भोके), अजिंक्य महादेव केसरकर (धवल कॉम्प्लेक्स), कौस्तुभ विश्वनाथ केळकर (कोडगाव साखरपा), सतीश चंद्रकांत खामकर (रा. गणेशनगर, कुवारबाव), सुशांत काशिनाथ घडशी (कारवांचीवाडी).

Toll Plaza Case
'मनसे'च्या आंदोलनाची धास्ती; मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्‍यावर कडक बंदोबस्त; तब्‍बल 50 पोलिस तैनात

तसेच मनीष विलास पाथरे (रा. काळाचौकी मुंबई), सुनील राजाराम साळवी (नाचणे रोड रत्नागिरी), महेश दत्ताराम घाणेकर (देऊड), महेश गणपत घाणेकट (जाकादेवी), रुपेश मोहन जाधव (कोसुंब, संगमेश्वर, सध्या मारुती मंदिर) आदीचा समावेश आहे. त्यांना अटक करून काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com