पर्यटकांनी केली पोलिस निरिक्षकांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

घटना थोडक्यात -
- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनारची घटना
- आठ जणांना अटक, तीन जण फरार
- पोलिस निरिक्षक जखमी

रायगड : जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनारी पर्यटकांकडून पोलिस निरिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.  

मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. पोलिस निरिक्षक सुरेश खेडेकर हे पेट्रोलिंगसाठी गेले असता त्यांनी समुद्र किनारी आरडा ओरड करणाऱ्या पर्यटकांची चौकशी केली. यावेळी हि मारहाणीची घटना घडली. या मारहाणीत पोलिस निरिक्षक खेडेकर यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

पुणे आणि औरंगाबाद येथील काही पर्यटक प्रिवेडींग शुट करण्यासाठी श्रीवर्धन समुद्र किनारी आले होते.  या मारहाण प्रकरणी आठ आरोपींना श्रीवर्धन पोलिस ठाण्यात अटक केली असून यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे, तर तीन आरोपी फरार झाले आहेत.

घटना थोडक्यात -
- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनारची घटना
- आठ जणांना अटक, तीन जण फरार
- पोलिस निरिक्षक जखमी

Web Title: tourist beaten police inspector at Shriwardhan beach