रायगड सर करताना पर्यटकाचा हदयविकाराने मृत्यु

सुनील पाटकर
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

महाड : रायगड किल्ल्यावर आलेल्या एका पर्यटकाचा गड चढत असतांना हदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.

महाड : रायगड किल्ल्यावर आलेल्या एका पर्यटकाचा गड चढत असतांना हदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.

दत्तात्रेय परिहार (वय 38) असे मृताचे नाव असुन ते बुलढाणा जिलह्यातील चिखली येथील राहिवासी आहेत. चिखली येथील अनुराधा इंग्रजी माध्यमशाळेचे ते उप मुख्याध्यापक होते. अनुराधा इंग्रजी माध्यमशाळेचे दहा शिक्षक मुख्याध्यापकासह सोमवारी सुट्टीनिमित्त रायगड पाहण्यासाठी आले होते.

महाड येथे वस्ती करुन हे सर्व आज सकाळी रायगडकडे निघाले. सर्वजण गड पायी चढत होते. वाटेतच सकाळी 9.20 वाजता या सर्वांनी फोटोही काढले. त्यानंतर गड चढतांना दत्तात्रेय परिहार यांना दम लागला परंतु तरीही ते चालत राहिले. यातच सकाळी 9.30 वाजता त्यांना तिव्र हद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्युच्या धक्याने सोबत आलेल्या दोघांनाही दवाखान्यात दाखल करावे लागले. महाड ग्रामीण रुग्णालयात परिहार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करुन गावी पाठवण्यात आला.
 

Web Title: tourist death due to heart attack while climbing on raigad fort