मजदूर संघाची कणकवलीत निदर्शने 

Of trade unions Demonstrations at Kankavali
Of trade unions Demonstrations at Kankavali

कणकवली (सिंधुदुर्ग) - केंद्र शासनाने मंजूर केलेल्या लेबर कोडमधील तरतुदीच्या विरोधात आज भारतीय मजदूर संघाच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी तत्काळ मागे घ्याव्यात, अन्यथा याही पेक्षा मोठे आंदोलन करून सरकारला जागे करावे लागेल, असा इशारा यावेळी कामगारांनी दिला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार आर.जे.पवार यांना देण्यात आले. 

भारतीय मजदूर संघाने केंद्र शासनाने आणलेल्या नवीन कामगार कायद्यातील तरतुदींना विरोध दर्शविला आहे. कायद्यातील औद्योगीक संबंधसंहिता 2020, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि सेवाशर्ती संहिता 2020 यातील काही तरतुदीमुळे कामगारांचे अधिकार धोक्‍यात येणार असल्याचे मजदूर संघाचे म्हणणे आहे.

याविरोधात मजदूर संघाने देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गतच येथील तहसीलदार कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. तसेच न्याय हक्कासाठी घोषणाबाजी केली मजदूर संघाच्या कार्यालयाकडून सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी येत सोशल डिस्टंसिंग पाळत निदर्शने केली व घोषणा दिल्या. त्यानंतर श्रमिक गीत गायनाचा कार्यक्रम झाल्यावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनावेळी चोख पोलिस बंदोबस्त होता. 

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष भगवान साटम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शनाला उपाध्यक्ष अशोक घाडी, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर, सचिव हरी चव्हाण, कणकवली तालुका प्रमुख राजेंद्र आरेकर, वैभववाडीचे दीपक गुरव, कुडाळच्या जयश्री मडवळ, हेमंतकुमार परब देवगडचे सत्यवान कदम,प्रकाश वाडेकर, विकास गुरव, विकास चाळके, अजित सावंत, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सल्लागार समिती सदस्य अँड विशाल मोहिते, भारतीय मजदूर संघ प्रदेश संघटनमंत्री रवींद्र पुरोहित, सुनीता ताटे, शुभांगी सावंत व इतर उपस्थित होते. 

केंद्राने लागू केलेल्या संहितेमधील तरतुदीमुळे कामगार संघटनेचे अधिकार काढून घेतले जाणार आहेत. यातून कामगार नाहीसे होऊन त्यांची सुरक्षितता नष्ट होईल. तसेच कंत्राटी कामगारांच्या हलाखीत वाढ होणार आहे. 
- अँड.विशाल मोहिते, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सल्लागार समिती सदस्य  

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com