अतिक्रमण मोहिमेविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारला बंद

३ तासांचे निषेध नाट्य, नगरपंचायतीवर धडकले
devrukh
devrukhsakal

देवरूख : येथील नगरपंचायतीने राबविलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचे (Anti-encroachment campaign)पडसाद आज देवरूखात उमटले. शहरातील ९० टक्के व्यापाऱ्यांनी आपली दुकाने अचानक बंद ठेवत कारवाईचा जाहीर निषेध केला. याबाबत जाब विचारण्यासाठी व्यापारी नगरपंचायत(devrukh nagarpanchayat) कार्यालयावर धडकले. यावर मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यावर व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला.

devrukh
दोन कोटींच्या मदतीने पीडितांचे मनोधैर्य वाढले

काल (ता. १९) सकाळी शहरात न. प. प्रशासन, कर्मचारी आणि पोलिस अशी संयुक्त मोहीम राबवताना मुख्य बाजारपेठ रस्त्यावर बसणारे भाजीवाले, हातगाडीवाले, गटारावर लावण्यात आलेला माल, फलक यावर कारवाई करण्यात आली. यामुळे बाजारपेठेतील रस्ता मोकळा झाला, वाहतूक कोंडी कमी झाली. काल केलेली सरसकट कारवाई करण्यात आली असून यात व्यापाऱ्यांना नाहक त्रास देण्यात आला आहे, असा आरोप करत व्यापारी संघटनेने आवाज उठवत सकाळी १० नंतर अचानक दुकाने बंद केली. नक्की काय झाले, याचा अंदाज कुणालाही आला नाही.

कारवाई मागे घेऊ नये

शहरातील अतिक्रमण हा गेल्या अनेक वर्षांचा विषय आहे. या विरोधात अनेक वेळा आवाज उठवण्यात आला; मात्र कारवाई झाली नाही. काल कारवाई झाल्यानंतर नागरिकांनी या मोहिमेचे कौतुक केले. ही कारवाई मागे घेऊ नये, अशी मागणी शहरातील जागरूक नागरिक करत आहेत.

व्यापाऱ्यांत एकमत नाही

शहरात दोन व्यापारी संघटना आहेत. पैकी सर्वाधिक जुन्या असलेल्या व्यापारी संघटनेने या मोहिमेविरोधात आवाज उठवला. दुसरी संघटना यात सामील न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकमत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

devrukh
शिक्षणाच्या जिद्दीने केली गरिबीवर मात ; पवन पोवारचे शिष्यवृत्तीत नेत्रदीपक यश

मंगळवारी सर्वांशी चर्चा..

काही वेळात व्यापारी नगरपंचायतीवर(devrukh news) धडकले. सरसकट झालेली कारवाई मागे घेण्याचा आग्रह धरण्यात आला. देवरूख नगरपंचायतीचा कारभार चिपळूण मुख्याधिकारी यांच्याकडे असल्यामुळे व्यापाऱ्यांना तोंड कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला. हा वादंग जवळपास तासभर सुरू होता. यानंतर मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, तेव्हा त्यांनी आपण स्वतः मंगळवारी देवरूखमध्ये या विषयावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या आश्वासनाचा मान ठेवत बाजारपेठ सुरू केली. दुपारी १.३० नंतर देवरूख बाजारपेठ सुरू झाली.(devrukh market started)

devrukh
गरिबीवर मात करीत दोहतरे करतेय स्वप्नांचा जिद्दीने पाठलाग!

अतिक्रमण हटाव मोहिमेत सरसकट कारवाई झाली आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून हा बंद मागे घेत आहोत. मंगळवारी यावर ठोस निर्णय न झाल्यास पुढील भूमिका ठरवू.

- बाबा सावंत

अध्यक्ष, व्यापारी संघटना, देवरूख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com