सलग सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

अमित गवळे 
गुरुवार, 29 मार्च 2018

पाली - महावीर जयंती व गुडफ्रायडे निमित्त सलग सुट्या असल्याने चाकरमानी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगड जिल्हा, कोकण व गोव्याकडे फिरण्यास निघाले आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी होती. गुरुवारी (ता.29) या मार्गावर माणगावजवळ सकाळ पासून वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची गैरसोय झाली. 

सलग सुट्ट्यांबरोबरच दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या विद्यार्थ्यांना देखील सुट्या लागल्या आहेत. यामुळे अनेक पर्यटक फिरण्यास निघाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर वाढलेली वाहने, अरुंद रस्ता, रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने, वाहतुकीचे नियम तोडणारे वाहन चालक, अवजड वाहने आणि लेन सोडून पुढे जाणाऱ्या गाड्या यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्गावर तैनात असले तरी लेन सोडून पुढे जाणाऱ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच खोपोली-पाली-वाकण मार्गावर देखील वाहनांची मोठी रिघ होती

माणगाव शहरातुन मुंबई गोवा महामार्ग जातो. तसेच पुण्यावरून ताम्हिणी मार्गे आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गे कोकणाकडे जाणारा मार्ग माणगाव शहरामध्ये मुंबई गोवा मार्गाला जोडतो. यामुळे दोन्ही बाजूने येणारी वाहने येथे एकत्र येतात आणि वाहतूक कोंडी उद्भवते. 

Web Title: traffic jam on Mumbai Goa highway