सलग सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुककोंडी

अमित गवळे
शनिवार, 28 एप्रिल 2018

पाली (रायगड) : सलग चार दिवस अालेल्या सुट्टयांमुळे शनिवारी (ता.२८) बहुतांश चाकरमानी व पर्यटक कोकणात आपल्या गावाककडे व फिरायला जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहरात सकाळपासून वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गासह पाली-खोपोली राज्य महामार्गावर देखिल वाहनांची गर्दी वाढली होती.

सलग अालेल्या सुट्ट्यांचा अानंद घेण्यासाठी पर्यटकांनी रायगड व दक्षिण कोकणाला पसंती दिली. एकाच दिवशी पर्यटक व चाकरमानी फिरण्यासाठी निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली होती. तसेच जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, नागाव श्रीवर्धन, दिवेअागर, हरिहरेश्वर हे समुद्र किनारे पर्यटकांनी बहरले होते. अष्टविनायकाचे क्षेत्र असलेल्या पाली, महड येथे देखिल भाविकांनी गर्दी केली होती. तर रायगड, मुरुड जंजिरा, कुलाबा व खांदेरी अादी किल्यांवर देखिल पर्यटक मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे या ठिकाणच्या हाॅटेल, लाॅज व इतर व्यवसाईकांचा धंदा तेजित होता. 

शनिवारी सकाळपासूनच माणगाव, कोलाड अादी ठिकाणी वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. तर वडखळ,वाकण, कोलाड, इंदापुर, पाली फाटा अादी महामार्गावरील मुख्य नाक्यांवर ठिकाणी वाहनांची गर्दी झाली होती.अनेकांनी चहा-नाष्टा घेण्यासाठी येथे अापल्या गाड्या थांबविल्या होत्या. परिणामी येथून जाणार्या वाहनांना मार्ग काढणे अवघड जात होते. व येथे देखील वाहतुक कोंडी होत होती. प्रवासी वाढल्याने खाजगी प्रवासी वाहतुकदारांचा धंदा देखिल तेजीत होता. महामार्गावरील वाहतुक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र महामार्गाचे धीम्या गतीने सुरु असलेले काम, अरुंद रस्ता,बेशिस्त वाहनचालक, लेन सोडून पुढे निघालेली वाहने व अवजड वाहने यामुळे वाहतुक कोंडी सोडविण्यास अडथळे येतात.

Web Title: traffic at mumbai goa highway