तळेरे-कोल्हापुर मार्गावरील वाहतुक बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

वैभववाडी - मांडकुली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे -कोल्हापुर मार्गावरील वाहतुक अनिश्‍चित कालावधीकरीता ठप्‍प झाली आहे. या मार्गावरील वाहतुक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. यासंदर्भात गगनबावडा बसस्थानकात चौकशी केली असता त्यांनी देखील दुजोरा दिला.

कोल्हापुर जिल्हयात गेला आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्हयात पुरस्थिती निर्माण झाली आहे.पुरस्थिती अधिक गंभीर होत असुन आज ता.१६ पहाटेपासुन गगनबावडा -कोल्हापुर मार्गावरील मांडकुली येथे रस्त्यावर पुराचे पाणी येण्यास सुरूवात झाली. तरीदेखील सकाळी या मार्गावरील वाहतुक सुरू होती.मात्र पाण्याचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने या मार्गावरील वाहतुक बंद केली आहे. मांडकुली येथे तीन ते चार फुट पाणी असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय याच मार्गावरील कळे येथे देखील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याचे बांधकाम विभागाकडुन सांगण्यात आले.

पुराचे पाणी वाढत असल्यामुळे तळेरे-कोल्हापुर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.ही वाहतुक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.त्यामुळे आज सकाळी तळेरेकडुन आलेल्या एस.टी बस वैभववाडी-फोंडा-राधानगरी मार्गे कोल्हापुर अशा सुरू आहेत.काही वाहने करूळ घाटातुन मागे पाठविण्यात आली तर भुईबावडा घाटाने कोल्हापुरकडे निघालेली वाहने पुन्हा करूळ घाटमार्गे उतरून फोंडाघाटमार्गे  कोल्हापरुकडे जात आहेत.

Web Title: traffic on the Talere-Kolhapur road