जिल्ह्यातील ३४ एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या । kokan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी

रत्नागिरी : जिल्ह्यातील ३४ एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी : महामंडळाने पगारवाढ केल्यानंतरही बंद सुरूच ठेवल्याने एसटी कर्मचाऱ्याविरोधात महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अडथळा करणाऱ्या तब्बल ३४ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २८८ जणांना निलंबित केले आहे तर २३५ कार्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. माळनाका येथील विभागीय कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांना कार्यालय परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. प्रशासन आक्रमक झाल्यामुळे बंदमध्ये सहभागी असलेल्यांची अडचण झाली आहे. अशावेळी संघटना गप्प का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आज सायंकाळपर्यंत एसटी विभागीय कार्यालयात बंदमधील ७० कर्मचारी हजर झाले. त्यामुळे आंदोलनामध्ये फूट वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. राज्यभरात कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून आंदोलन तीव्र केले आहे. असे असताना कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता फूट पडू लागल्याचे दिसत आहे. एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आजपर्यंत सोमवारी (ता. ६) ५०० कर्मचारी एसटीच्या सेवेत रुजू झाले आहे.

हेही वाचा: पुणे : लसीकरण केंद्र पुन्हा गजबजली

आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांसह निलंबित, सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी अंतिम नोटीस न स्वीकारल्याने त्यांच्या नोटिसा नोटीस बोर्डवर प्रशासनाने लावल्या आहेत. शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत; मात्र दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेली एसटी सेवा बंद असल्याने नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. प्रवाशांचा दबाव वाढत असल्याने आता कारवाईचे धोरण महामंडळाने स्वीकारले आहे. जिल्ह्यातील ३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, २८८ जणांना निलंबित तर २३५ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

कारवाईमुळे कर्मचारी विचलित

प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवल्याने आता कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. हक्काच्या नोकरीचे काय, असा सूर कर्मचाऱ्यांमध्ये उमटू लागला आहे. बंदमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या प्रमुखांची बैठक झाली आहे; मात्र त्यातील तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.

Web Title: Transfer Of 34 St Employees In The District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KokanRatnagiridistrict
go to top