पाली खोपोली मार्गावरील वाहतूक सुरु

अमित गवळे
बुधवार, 27 जून 2018

पाली - सुधागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पाली खोपोली मार्गावर खुरावले फाटा येथील रास्ता सोमवारी (ता.२५) वाहून गेला होता. एमएसआरडीसी व ठेकेदाराच्या प्रयत्नानंतर हा रस्ता दुरुस्त करण्यात आला.मंगळवारी (ता.२६) पहाटेपासून येथून वाहतुक सुरु झाली आहे. मात्र अवजड वाहतूक बंद केली आहे.

या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. येथील एका मोरीचे काम अपूर्ण होते. तेथे पाणी साठल्यामुळे माती व रस्ता वाहून गेला. हा रस्ता दुरुस्तीचे काम ताबडतोब सुरू करण्यात आले. तेथे नवीन मोठी मोरी व भराव टाकुन रस्ता तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त करण्यात आला. पावसाळा संपल्यावर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: Transportation on Pali Khopoli road started

टॅग्स