वृक्षांचे करूया संवर्धन, पृथ्वीचे होईल नंदनवन...

अमित गवळे
शुक्रवार, 6 जुलै 2018

पाली (रायगड) : महाराष्ट्र शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे धोरण अाहे. या उपक्रमास अापला हातभार लावण्यासाठी सुधागड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ताडगांव ने वृक्ष लागवडीसह संवर्धनाचा वसा घेतला अाहे. नुकतेच ग्रामपंचायत ताडगांव, बॉम्बे ९९ वेलफेर असोसिएशन आणि टिकेडिके परिसर विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून येथे वृक्षलागवड करण्यात आली.

पाली (रायगड) : महाराष्ट्र शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे धोरण अाहे. या उपक्रमास अापला हातभार लावण्यासाठी सुधागड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ताडगांव ने वृक्ष लागवडीसह संवर्धनाचा वसा घेतला अाहे. नुकतेच ग्रामपंचायत ताडगांव, बॉम्बे ९९ वेलफेर असोसिएशन आणि टिकेडिके परिसर विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून येथे वृक्षलागवड करण्यात आली.

लावलेल्या झाडांचे शेळ्या आणि गुरांपासून बचाव करण्यासाठी सर्व झाडांना येत्या १० दिवसात कुंपण करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच उन्हाळ्यात सर्व झाडे जगवण्यासाठी त्यांना योग्य त्या वेळी पाणी देण्यत येणार आहे. बॉम्बे९९ वेलफेर असोसिएशन माध्यमातून येथे पुढील आठवड्यात ५०० झाडे लावणार आहे. तसेच ग्रुप ग्राम पंचायत ताडगांवच्या माध्यमातून पुढील आठवड्यात ८०० झाडे लावण्यात येणार आहेत .

सुरुवातीस ताडगाव सरपंच छब्या इका जाधव ,उपसरपंच महेश देशमुख ,माजी सरपंच आप्पा खताळ आणि राकेश साठे अध्यक्ष युवा मित्र मंडळ ताडगांव ,नवनाथ देशमुख माजी सदस्य ,संजय साठे यांच्या हातून वृक्षरोपन करण्यात आली .

कार्यक्रमासाठी अाय.डी जळगावकर - वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण पाली, एन.व्ही. धुमाळ – वनपाल सामाजिक वनीकरण पाली, आघाव-वनरकक्षक पाली , नदीम मुगे यांनी देखिल वृक्षारोपण केले. जळगावकर यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. सर्वांना झाडे लावण्यासाठी आणि जोपासण्यासाठी मार्गदर्शन केले . त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला म्हणून ग्रुप ग्रामपंचायत ताडगांव आणि बॉम्बे ९९ वेलफेर असोसिएशनला ११०० फळझाडे आणि औषधी झाडे मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे . तसेच पुढल्या वर्षी ताडगांव ते घोडगांव रस्त्याच्या दोन्ही बाजूने आणि ताडगांव ग्रामपंचायत मध्ये शासनामार्फत झाडे लावण्यात येतील असे जळगावकर यांनी सांगितले. ह्या कार्यक्रमाला आलेला सर्व खर्च बॉम्बे ९९ वेलफेर  असोसिएशने केला.  बॉम्बे ९९ वेलफेर असोसिएशनच्या ८० सभासदांनी सहभाग घेतला.

वृक्ष लागवड व संवर्धन पुढील पिढीसाठी अावश्यक अाहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे.  
- सचिन साठे, सचिव टिकेडिके परिसर विकास संघर्ष समिती

Web Title: tree plantation in pali