उजाड डोंगरावर बहरले नंदनवन

अमित गवळे
सोमवार, 1 जुलै 2019

अतिशय सुनियोजित या मोहिमेत जून 16 ला एकूण 512 खड्डे खोडण्याचे काम पूर्ण झाले होते. त्यात कोणती माती व खत टाकावे आणि त्यांनतर खड्ड्यात कोणत्या प्रकारची रोपे लावावीत यासाठी वनविभागाकडून सर्व शास्त्रशुद्ध माहिती घेतली होती. या अभियानास वनविभागाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

पाली : वावे गावासमोरील डोंगर व माळरान उजाड झाले होते. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हे उजाडलेलं जंगल पुन्हा एकदा बहरून टाकण्यासाठी तरुणांसह गावातील ग्रामस्थांनी मिळून या डोंगरावर शनिवारी (ता.30) शास्त्रशुद्ध पद्धतीने 512 रोपांची लागवड केली.

अतिशय सुनियोजित या मोहिमेत जून 16 ला एकूण 512 खड्डे खोडण्याचे काम पूर्ण झाले होते. त्यात कोणती माती व खत टाकावे आणि त्यांनतर खड्ड्यात कोणत्या प्रकारची रोपे लावावीत यासाठी वनविभागाकडून सर्व शास्त्रशुद्ध माहिती घेतली होती. या अभियानास वनविभागाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शनिवारी (ता. 30) थोरामोठ्यांसह लहानग्यांनी मिळून 512 खड्यांत रोपे लागवड केली. त्यासाठी वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नुसते रोपे लावून न थांबता ती जगविण्यावर अधिक भर देऊन त्यांचे योग्य संगोपन करण्यात येणार आहे.

या मेहनतीचे संपूर्ण श्रेय वावे गावातील ग्रामस्थ व  तरुणांचं आहे  असे गावातील तरुण व भैरिनाथ क्रीडा मंडळाने यांनी सकाळला संगितले. या मोहिमेसाठी वावे गावातील सर्व तरुण तसेच ग्रामस्थ यांनी अथक मेहनत घेतली. सुधागड वनक्षेत्रपाल अधिकारी समीर शिंदे सुधागड़, वनरक्षक डी. के.तलेले, जी.बी.परिहर, एस. एन.गाडेकर यांनी खुप मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या मोहिमा संपुर्ण  सुधागड़ मध्ये व्हावी असे आवाहन शिवऋण प्रतिष्ठान ने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tree plantation in pali