Sumita Fasal
sakal
पाली - परिस्थिती कितीही प्रतिकूल असली आणि संकटांचे डोंगर समोर उभे असले, तरीही प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात, हे पाच्छापूर माध्यमिक विद्यालयातील सुमिता गोविंद फसाळ हिने सिद्ध करून दाखवले आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि शारीरिक व्याधींवर मात करत सुमिताने दहावीच्या परीक्षेत 71.40 टक्के मिळवून उज्ज्वल यश संपादन केल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.